CBSE Education : सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न, सरकारी शाळेतच मिळणार हायटेक शिक्षण; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

CBSE in Schools : सीबीएसई पॅटर्न सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहे. कारण थेट सरकारी शाळांमध्येच सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे... मात्र सीबीएसई पॅटर्न कधी लागू केला जाणार? त्याची अंमलबजावणी कशी होणार? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
CBSE Education
CBSE EducationSaam Tv
Published On

मिताली मठकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

नव्या शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळांमध्येच सीबीएससी पॅटर्नचं शिक्षण दिलं जाणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तशी घोषणाच सभागृहात केलीय. राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे.

शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार..

- नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गांसाठी सीबीएसई पॅटर्न

- वर्षभरात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार

- 2026-27 शैक्षणिक वर्षापासून 2 टप्प्यात अंमलबजावणी

- CBSE अंतर्गत पाठ्यपुस्तकं मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार

- महाराष्ट्राशी संबंधित इतिहासाचा सर्वाधिक समावेश

सरकारी शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न सुरू झाल्यास त्याचे नेमके काय फायदे होतील ते देखील पाहूयात..

- सीबीएससी पॅटर्नमध्ये सर्व राज्यात एक सारखाच अभ्यासक्रम असतो

- वेगवेगळ्या राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठी बदल्या आणि शाळा बदलणे खूप सोपे होते

- बहुतांश विद्यार्थी आणि पालक सीबीएससी पॅटर्न साठी अनुकूल आहेत.

- सीबीएसई पॅटर्नचा स्पर्धात्मक परीक्षांना फायदा होणार

CBSE Education
Beed News : दुसरा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर... बीडमधील शिक्षकांचा आक्रोश, थेट सरकारलाच दिला इशारा

राज्य सरकारकडून यंदा पहिलीच्या वर्गांसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे.. मात्र त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे का? वर्षभरात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असलं तरी विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्नसाठी कसं तयार केलं जाणार? राज्यात शिक्षक भरतीची घोषणा कागदावर असताना नवा पॅटर्नची अंमलबजावणी शक्य होईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.. त्यामुळे नियोजनाविना घोषणा केल्यास फक्त शिक्षक आणि विद्यार्थीच नव्हे तर एकूण शिक्षण व्यवस्थेचाच गोंधळ उडण्याची शक्यता अधिक आहे.

CBSE Education
Abu Azmi Aurangzeb Tomb : लोकांना भडकवण्याचा प्रयत्न... औरंगजेबाची कबर उखडण्यावरुन अबू आझमींचा संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com