Abu Azmi Aurangzeb Tomb : लोकांना भडकवण्याचा प्रयत्न... औरंगजेबाची कबर उखडण्यावरुन अबू आझमींचा संताप

Abu Azmi Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर उखडण्यावरुन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी संतापले आहेत. औरंगजेबाची कबर हा मुद्दा राज्यभरात वादाचा विषय ठरत आहे. अशात आझमी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
Abu azmi Aurangzeb Tomb
Abu azmi Aurangzeb TombSaam tV
Published On

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यभरात गेले काही दिवस औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु आहे. काही संस्थांनी ही कबर उखडून टाकण्याची मागणी केली आहे. या कबरीवरुन ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कबर प्रकरण तापल्याने दंगल उसळली होती. या मुद्द्यावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन अबू आझमी संतापले आहेत. 'कबर उखडून जर शांतता पसरणार असेल, देशाची प्रगती होत असेल; तर ती खुशाल उखडा', असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. आज सत्याग्रह दिनानिमित्त ते महाडच्या चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते.

'इतक्या वर्षांमध्ये कधी औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला नव्हता, आताच का निघाला असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला. कबर उखाडल्याने देशातील प्रश्न सुटणार आहेत का? हिंदू-मुस्लिम वाद वाढवायचा, लोकांना भडकवायचे आणि मुख्य मुद्द्यांकडून त्यांचे लक्ष विचलित करायचे यासाठी हे सर्व सुरु आहे', असे अबू आझमी यांनी वक्तव्य केले.

Abu azmi Aurangzeb Tomb
Disha Salian Death Case : दिशा सालियान प्रकरणी शिंदे-पवार यांच्याकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण | VIDEO

अधिवेशनाच्या सुरुवातीला औरंगजेबाबाबत वक्तव्य केल्याने अबू आझमी अडचणीत आले होते. त्यांनी 'मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेब हा उत्तम शासक होता. चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामधील लढाई राजकीय स्वरुपाची होती. तेव्हाची लढाई ही हिंदू-मुसलमान अशी नव्हती' असे वक्तव्य केले होते' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनातून आझमींचे निलंबन करण्यात आले होते.

Abu azmi Aurangzeb Tomb
Beed News : दुसरा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर... बीडमधील शिक्षकांचा आक्रोश, थेट सरकारलाच दिला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com