Disha Salian Death Case : दिशा सालियान प्रकरणी शिंदे-पवार यांच्याकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण | VIDEO

Disha Salian Case Updates : दिशा सालियान प्रकरणामुळे आदित्य ठाकरे पुन्हा अडचणीत येणार असल्याचे म्हटले जात आहे. दिशाच्या वडिलांनी या मुंबई उच्च प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात शिंदे-पवार यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी याचिका दाखल केली की त्यांना याचिका करायला लावली असा सवाल करत अमोल मिटकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तपासयंत्रणांनी एखाद्याला क्लिन चिट दिली तर त्याच्यावर चिखल फेक करणं चुकीचं आहे असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

'२०२५ सुरु आहे. ही घटना २०२० मध्ये घडली होती. इतक्या वर्षांनी हे प्रकरण पुन्हा पटलावर कसं आलं, दिशाच्या वडिलांना वाटत असेल, की आपल्या मुलीला न्याय मिळायला हवा तर ते इतकी वर्ष शांत का होते? आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलं. चौकशी करा पण एखादा त्यात नाहक कुणी त्यात गुंतू नये', असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

याचिका दाखल करणं हा त्या कुटुंबाची वैयक्तिक निर्णय आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नसल्याचे सीआयडीने सांगितले. १४ व्या मजल्यावरुन खाली पडून दिशाचा मृत्यू झाला. शासकीय यंत्रणांनी अहवाल दिल्यानंतरही कुणावर चिखलफेक करणे मला तरी योग्य वाटत नाही. पोलिसांनी त्यांना (आदित्य ठाकरे) क्लिनचिट दिली आहे. तर हायकोर्टाच्या याचिकेतून फारसं काही घडणार नाही, असे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com