Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ४ वेळा नापास, पण जिद्द सोडली नाही, UPSC क्रॅक केलीच; तृप्ती कलहंस यांची सक्सेस स्टोरी वाचाच

Trupti Kalhans Success Story: आयुष्यात कितीही अपयश आले तरीही प्रयत्न कधीच सोडू नये. तृप्ती कलहंस यांनी चार वेळा यूपीएससी परीक्षा दिली. तृप्ती यांना पाचव्या प्रयत्नात यश मिळवले.

Siddhi Hande

प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात, असं म्हटले जाते. आयुष्यात प्रत्येकालाच एका वळणावर अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु कितीही अपयश आले तरीही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला नक्कीच यश मिळते. असंच काहीस तृप्ति कलहंस यांच्याबाबत झालं.

तृप्ती कलहंस यांना एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल ४ वेळा अपयश आले तरीही त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना करुन हे मिळवलं. (Success Story Of Trupti Kalhans)

चार वेळा अपयश (Success Story Of UPSC)

तृप्ती कलहंस यांना पहिल्या चार प्रयत्नात यूपीएससी परिक्षेत अपयश मिळाले. तरीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी पाचव्या प्रयत्नात जिद्दीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. पहिल्या तीन प्रयत्नात त्यांनी यूपीएससी मेन्स परीक्षा पास केली नाही. चौथ्या प्रयत्नात त्यांनी मागील चुकांमधून धडा घेतला. त्यांनी पुन्हा त्या चुका केल्या नाहीत. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी प्रिलियम्स क्लिअर केल्या. परंतु मेन्स परिक्षेत पुन्हा नापास झाल्या.

एका वर्षाचा ब्रेक

त्यांनी हे अपयश फार मनावर घेतले नाही. त्यांनी चौथ्यांदा अपय़श आल्यानंतर एक वर्ष ब्रेक घेतला. एक वर्ष ब्रेक घेल्यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यास केला. त्यांनी पाचव्या प्रयत्नात यश मिळवले. त्या २०१३ मध्ये यूपीएससी परिक्षेत १९९ रँक मिळवून पास झाल्या.

कोचिंग क्लासशिवाय मिळवलं यश (Trupti Kalhans Success Story)

तृप्ति कलहंस यांनी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय हे यश मिळवले आहे. त्यांनी कितीही अपयश आले तरीही त्यावर मात केली. त्यामुळे त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी आदर्श आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT