Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam Digital

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Kalyan News : तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या जवळील लॅपटॉप हिसकावून दोन चोरटे पसार झाल्याची घटना कल्याण पूर्व स्टेशन जवळील पार्किंग परिसरात घडली. या घटनेत तरुणी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अभिजित देशमुख

तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या जवळील लॅपटॉप हिसकावून दोन चोरटे पसार झाल्याची घटना कल्याण पूर्व स्टेशन जवळील पार्किंग परिसरात घडली. या घटनेत तरुणी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही तरुणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे .ही तरुणी मुंबई अंधेरी परिसरात राहते. कल्याण मधील लोकग्राम परिसरात राहणाऱ्या एका मित्राला लॅपटॉप देण्यासाठी ती कल्याणमध्ये आली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी या दोन चोरट्यांचा शोध सुरू केलाय.

मुंबई अंधेरी परिसरात राहणारी एक तरुणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. ही तरुणी आज कल्याण येथे राहणाऱ्या आपल्या मित्राला लॅपटॉप देण्यासाठी कल्याण मध्ये आली होती. कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्टेशन जवळील पार्किंग मध्ये ही तरुणी आली. इतक्यात दोन अज्ञात इसम तिच्याजवळ आले. तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला. तिने डोळे मिटले मात्र तिच्या अंगाची आग आग सुरू झाली.

Kalyan Crime News
Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

याच दरम्यान या चोरट्यानी तिच्या जवळील लॅपटॉप हिसकावून पळ काढला .या घटनेत ही तरुणी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या दोन अज्ञात चोट्यांचा शोध घेत आहेत या घटनेमुळे कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे.Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडांची तस्करी; जमिनीत पुरलं 11 लाख रुपयांची लाकडं

Kalyan Crime News
Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com