
मुंबई : (Rahul Roy IIT Dropout success story) भारतातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचे असते. मात्र, काहीजण आपल्या वेगळ्या ध्येयांसाठी धाडसी निर्णय घेतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे राहुल राय यांची, ज्यांनी 2015 मध्ये आयआयटी बॉम्बे मधील शिक्षण सोडून व्हॉर्टन स्कूल, यूएसए येथे अर्थशास्त्र विषयात बॅचलर ऑफ सायन्स करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात दिसली मोठी संधी
2019 मध्ये पदवी घेतल्यानंतर, राहुल यांनी मॉर्गन स्टॅनली येथे परकीय चलन (FX) मॅक्रो हेज फंड विभागात विश्लेषक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. मात्र, एक वर्षातच त्यांनी नोकरी सोडून नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्या काळात क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान भारतात लोकप्रिय होत होते, आणि राहुल यांना या क्षेत्रात मोठी संधी दिसली.
गामा पॉइंट कॅपिटलची केली स्थापना
जानेवारी 2021 मध्ये, राहुल यांनी ईश अग्रवाल आणि सनत राव यांच्यासोबत गामा पॉइंट कॅपिटल या क्रिप्टो हेज फंडची स्थापना केली. या कंपनीने डिजिटल मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मजबूत धोरण आखले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे, गामा पॉइंट कॅपिटलने अल्पावधीतच क्रिप्टो क्षेत्रात मजबूत स्थान निर्माण केले.
ब्लॉक टॉवर कॅपिटलकडून विकत घेतली कंपनी
मे 2021 मध्ये, गामा पॉइंट कॅपिटलचे यश पाहून ब्लॉक टॉवर कॅपिटलने (BlockTower Capital) कंपनी 286 कोटी रुपयांना ( 35 दशलक्ष अमेरिकन डॉलर) विकत घेतली. हा निर्णय राहुल आणि त्यांच्या टीमसाठी आर्थिक यशाचा मोठा टप्पा ठरला. आज राहुल रॉय ब्लॉक टॉवर कॅपिटल मध्ये मार्केट-न्यूट्रल विभागाचे सह-प्रमुख म्हणून काम पाहतात.
प्रेरणा देणारा आहे राहूर राय यांचा प्रवास
राहुल राय यांचा प्रवास हे सिद्ध करतो की स्वप्नांचा पाठलाग, धाडसी निर्णय आणि बदलत्या संधींशी जुळवून घेणे आयुष्याला वेगळ्या उंचीवर नेऊ शकते. आयआयटी सोडण्यापासून ते क्रिप्टो क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.
Edited By- नितीश गाडगे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.