सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या पोस्ट ऑफिसच्या आहे. पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत योजनेअंतर्गत आता व्याज देणे बंद झाले आहे. या योजनेअंतर्गत ठेवींवर व्याज न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय बचत योजनेच्या संदर्भात सूचना जारी केली आहे.
या योजनेअंतर्गत ठेवीदारांना ३० सप्टेंबरपर्यंत पैसे काढण्यास सांगण्यात आले आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून या योजनेत व्याज मिळणार नाही.
सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, ज्या ठेवीदारांना आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक केली जाते.या योजनेतील पैसे तुम्ही ३० सप्टेंबरपूर्वी काढू शकतात.
राष्ट्रीय बचत योजना ही १९९२ मध्ये गुंतवणूकीसाठी पूर्ण बंद करण्यात आली होती. या योजनेत १९९२ नंतर कोणीही गुंतवणूक करु शकत नाही. मात्र, या योजनेअंतर्गत सरकार चक्रवाढ व्याज देत होते. हे व्याजदेखील आता दिले जाणार नाही. या योजनेत ७.५ टक्के व्याजदर दिले जात होते.
राष्ट्रीय बचत योजना १९८७ रोजी सुरु करण्यात आली होती. ती १९९२ मध्ये बंद झाली होती. काही काळानंतर ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली होती. सरकार या योजनेत व्याजदर देत होते. ज्यांनी या योजनेत गुंतवणूक केली त्यांना या योजनेअंतर्गत चांगले व्याजदर मिळत होते. (National Saving Scheme)
राष्ट्रीय बचत योजनेत तुम्हाला वार्षिक ४०,००० रुपये गुंतवणूक करावी लागायची. या गुंतवणूकीवर कलम 80C अंतर्गत सूट मिळायची. या योजनेत लॉक इन कालावधीनंतर मूळ रक्कम आणि व्याज काढायची परवानगी होती. या योजनेत पूर्वी ११ टक्के व्याज मिळायचे. त्यानंतर हे व्याज ७.५ टक्के करण्यात आले. १ऑक्टोबरनंतर उघडलेल्या कोणत्याही ठेवींवर आता व्याज दिले जाणार नाही. (National Saving Scheme)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.