Sharad Pawar News : लोकसभेत जनतेने जागा दाखविली म्हणून राज्यात आर्थिक लाभाच्या योजना; शरद पवार यांचा महायुतीवर निशाणा

Maharashtra Assembly Election : आज देशपातळीवर आम्ही लोकांना एकत्र आणलं. लोकांना संकटातून बाहेर काढणं आमचा उद्देश आहे. यामुळे महाविकास आघाडीची स्थापना केली ही आघाडी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल. आम्ही पाच गॅरंटी जाहीर केली
Sharad Pawar
Sharad PawarSaam tv
Published On

Maharashtra Assembly Elections 2024 :  राज्यात नवीन नवीन योजना काढल्या. लोकसभेची निवडणूक होण्याआधी कधी योजना काढली नाही. लोकसभेत जनतेने जागा दाखवली म्हणून काही ना काही आर्थिक लाभाच्या योजना काढल्या. दहा वर्षात हे आठवलं नाही. निवडणुकीत फटका बसल्याबरोबर काढल्या. ज्या योजना राज्य सरकारने आता काढल्या, त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण हे उद्याला मतदान संपल्यानंतर अनेक योजना संबंधात खरा चेहरा समोर दिसेल आणि लोकांची फसगत झाल्याचे दिसेल; असे मत शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 

आज देशपातळीवर आम्ही लोकांना एकत्र आणलं. लोकांना संकटातून बाहेर काढणं आमचा उद्देश आहे. यामुळे महाविकास आघाडीची स्थापना केली ही आघाडी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल. आम्ही पाच गॅरंटी जाहीर केली. त्यात महिला, शेतकरी, जात निहाय जनगणना, बेरोजगार तरुण, आरोग्य यांचा समावेश आहे. उद्याचा महाराष्ट्र कसा आणि कुणी घडवायचा? लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे? याचा निर्णय घेण्याची आजची सभा आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन केली. महाराष्ट्राचा चेहरा बदलविण्यासाठी साथ द्या; असे आवाहन देखील पवार यांनी केले. 

Sharad Pawar
Sillod vidhan Sabha : अब्दुल सत्तार जिंकणार का? सिल्लोडमध्ये लागली पैज, जिंकणाऱ्यास मिळणार बुलेट

देशात सत्ता बदलाची अपेक्षा होती 

सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा मी इथे आलो होतो. लोकसभेत आमच्या उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं. आमची अपेक्षा होती, देशाची सत्ता बदलावायची. दहा वर्षात मोदींच्या कामांचं समाधान नाही. पुन्हा त्यांच्या हातात सत्ता गेली. पहिल्या निवडणुकीसारखी स्थिती नाही. आता स्वत:च्या ताकदीवर मोदी सत्ता बसवू शकले नाहीत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या मदतीने सत्ता बनवली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या हा देश शेतकऱ्यांचा आहे. आज या देशात लोकांचं, अन्न आणि गरज सहज भागतील असं धोरण करणं गरजेचं आहे. मी कृषी मंत्री असतांना शेतकर्‍यांची गरज भागवली आणि शेतकऱ्यांनी लोकांची गरज भागावली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे दु:ख देणारी बातमी आहे. कृषीमंत्री असताना बातमी आली, तेव्हा मी अस्वस्थ झालो. त्यावेळी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांच्याकडे गेलो; तेव्हा शेतकऱ्यांचे दुःख समजावं लागेल असं सांगितलं. त्यांना सांगून शेतकऱ्यांची तिथे जाऊन व्यथा समजण्याची विनंती केली. नंतर आम्ही नागपूर, वर्धा आणि यवतमाळ आलो आणि शेतकऱ्यांना भेटलो. 

Sharad Pawar
Gita Jain : अपक्ष म्हणून धाकधूक नाही, पण तिकीट नाकारल्याची खंत; गीता जैन यांची सडेतोड टीका

सत्तेत राहण्याचा अधिकार नाही 

शेतकऱ्यांच्या परिवाराला विचारलं तर त्यांनी सांगितलं शेत पिकाला भाव मिळाला नाही आणि कर्जबाजारी झालो. कर्ज वाढत गेला आणि ते फेडू शकलो नाही. एक दिवस सावकार आला आणि घरी समान काढलं. शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जामुळे हे सर्व घडलं होतं. आम्ही या गोष्टीचा विचार केला आणि देशात ६० टक्के शेतकरी आहे, यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येत असेल तर धोरण बदलावं लागेल, याचा विचार केला. आम्ही आठ दिवसात निर्णय घेऊन ७० हजार कोटींचं कर्ज माफ केलं होतं. आज पुन्हा तीच स्थिती आहे. देशात मोदी, शहा यांचे राज्य आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाची त्यांना किती जाणीव आहे हे सांगता येत नाही. बाजारात शेतमालाला भाव नाही. कापूस, तूर, सोयाबीन कवडीमोल भावात विकत आहे. शेतकरी संकटात आला आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार काही निर्णय घेत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी जे प्रवृत्त करतात त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ही निवडणूक यासाठी महत्वाची आहे. आज शेतकऱ्यांना लागणाऱ्या खत, औषधी आणि इतर खर्च वाढला पण भाव नाही.

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने दिल्लीत एक तज्ञ कमिटी नेमली होती. त्यात सामान्य माणसाचं जीवनमान कुठं गेले? मी अभिमानाने सांगतो जेव्हा आमच्या हातात सत्ता होती; तेव्हा महाराष्ट्राचा नंबर देशात पहिल्या क्रमांकावर होता. आता भाजपच्या हातात सत्ता आहे. तेव्हा महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. बेरोजगारी वाढली आहे, शिक्षणाचा स्तर घसरत आहे. सरकार बेरोजगाराला काम मिळेल असं पाऊल टाकत नाही. ही सर्वांची समस्या आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com