Gita Jain : अपक्ष म्हणून धाकधूक नाही, पण तिकीट नाकारल्याची खंत; गीता जैन यांची सडेतोड टीका

Mira Bhaiynder News : प्रत्येक राजकीय पक्षाची काहीना काही मजबुरी असते. या पक्षाची काही मजबुरी असेल. विचारधारा हिंदुत्ववादी असून सुद्धा नवाब मलिकांना तुम्ही इन डायरेक्टली सपोर्ट केला आहे
Gita Jain
Gita JainSaam tv
Published On

वैदही काणेकर

मीरा भाईंदर : तिकीट नाकारलं याचा लोकांमध्ये रोष आहे. काय कमी होते. ज्यांना तिकीट दिलं त्यांच्या तुलनेत स्वच्छ चेहरा आहे. भ्रष्टाचार नाहीये मी लोकांबरोबर ग्राउंड लेव्हलपासून जुळून राहिले, तरी तिकीट नाकारली गेल्याची खंत आहे. २००२ च्या पहिल्या निवडणुकीमध्ये पण मी अपक्ष होते. २०१९ ला देखील अपेक्ष होती आणि जिंकली. मला अपक्ष म्हणून फारशी धाकधूक वाटत नाही. असे मत मीरा भाईंदर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी बोलताना व्यक्त केले. 

गीता जैन म्हणाल्या, कि प्रत्येक राजकीय पक्षाची काहीना काही मजबुरी असते. या पक्षाची काही मजबुरी असेल. विचारधारा हिंदुत्ववादी असून सुद्धा नवाब मलिकांना तुम्ही इन डायरेक्टली सपोर्ट केला आहे. त्यांचा पार्श्वभूमी ही अपराधिक आहे तरी त्यांना पाठिंबा मिळाला आहे. दाखवायला विरोधात आहोत, असं म्हणूनही तुम्ही सपोर्ट केला आहे. आता मनसेला ही सपोर्ट केला आहे. आमच्याकडे बरेच मारवाडी, गुजराती आणि यूपीवाले आहेत. आमचे मेन वोटर ही तेच आहेत. आपले लोक दुखावले आहेत. तसेच माझ्या बाबतीत झाला आहे की पक्षाची काहीतरी मजबुरी असेल आणि ती मोठी असेल म्हणून मला तिकीट नाकारलं. 

फक्त पैसे नको, हक्क आणि सन्मान द्या 
लाडकी बहिणी योजना चालवली गेली आहे आणि त्याच लाडक्या बहिणीकडून तुम्ही तिचा हक्क हिसकावून घेतला. या दोन विरोधी गोष्टी लोकांना रोषमध्ये आणत आहेत. एकीकडे तुम्ही लाडकी बहीण करत आहात. लाडकी बहीण म्हणजे प्रत्येक महिलालेला काहीतरी देणं हे नव्हे तर प्रत्येक महिलेला सन्मान द्या. फक्त पैसे नको त्यांचा हक्क आणि त्यांचा सन्मान तुम्ही त्यांना द्या. पण ते तुम्ही करू शकत नाही. 

ठाकरेंची ऑफर नाकारली होती 
२०१९ ला महायुती नव्हती तर मी बीजेपी ला सपोर्ट केला. आम्ही लोकांनाही वादा केलं होतं की बीजेपीला सपोर्ट करणार. मला उद्धव ठाकरे यांनी बोलवून मंत्री पदाची ऑफर दिली होती..मी नाकारली. पण जेव्हा जेव्हा पक्षाला गरज होती, तेव्हा तेव्हा मी बीजेपीला सपोर्ट केला. माझी लढाई त्या पक्षाशी नाही, तर त्या पक्षातील एका नेत्याशी आहे. मी आणि नरेंद्र मेहता एकाच पक्षात होतो. नरेंद्र मेहता यांना तिकीट दिलं मी अपक्ष उभे राहिले मी जिंकले. जिंकल्यानंतर पण मी परत बीजेपीला सपोर्ट केला. याचा अर्थ माझा राग बीजेपीवर नसल्याचे गीता जैन यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी माझ्यासाठी आयडल आहेत. आताही माझ्या मनात दुसरा विचार येत नाही..

Gita Jain
Sillod vidhan Sabha : अब्दुल सत्तार जिंकणार का? सिल्लोडमध्ये लागली पैज, जिंकणाऱ्यास मिळणार बुलेट

फडणवीसांच्या सांगण्यावरुन गुवाहाटीला गेले 
भाजपच्या नाराज त्या गटातील प्रत्येक व्यक्तीला माहीत होतं की मला गुवाहाटीमध्ये शिंदे यांच्यासोबत पाठवणारे कोण होते? मला देवेंद्र फडणवीस यांनी बोलवून तिथे पाठवलं होतं. त्यांना मी सांगितलं होतं की गुवाहाटी कशाला? तुम्हाला हवं तर मी बीजेपी जॉईन करते. त्यांनी मला समजावून सांगितलं. त्यांचा आदेश घेऊन मी गुवाहाटीला गेले होते. त्यातच शिंदेजी यांनी ही सीट पकडून ठेवली होती. त्यांना पाठिंबा देणारी मी त्यामुळे ही शिवसेनेची सीट आहे. तेव्हा फडणवीस यांनी म्हटलं की पाठवणारा मी आहे, आम्ही ताईंना बीजेपीतून तिकीट देऊ. हे संभ्रम निर्माण झाले होते ते देवेंद्रजी यांनी स्वतः येऊन क्लिअर करायला हवं. कारण मी बोललेली एकही शब्द खोटा नाही. मजबूरी काय आहे ते वरिष्ठांनी येऊन सांगावं. पण मी शहराच्या विकासासाठी लढणार आहे. ही महिला संघर्ष करून लोकांसाठी चढते हिंदुत्वाची आणि पार्टीची विचारधारा घेऊन जाते. तर काही कारण नसताना तिकीट नाकारलं तर हा नक्कीच अन्याय झाला.

Gita Jain
Sanjay Gaikwad : मातोश्रीवर दहा खोके पोहचविले आणि तुपकरांचा पत्ता कट झाला; संजय गायकवाड यांचा आरोप


योगींच्या भूमिकेबद्दल आदर 
योगीची यांच्या हिंदुत्वाबद्दल त्याच्या भूमिकेबद्दल मला आदर आहे. जेव्हा मीरा रोड मध्ये दगडफेक झाली त्यावेळेस योगी यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून मी त्या परिस्थितीमध्ये तिथे उभे होते. माझ्यासाठी ते देव आहेत. राजकारणात मी आलेले इलेक्शनचा वेळ आहे आरोप प्रत्यारोप आणि बदनामी हे होतच राहणार. भाषण करताना पूर्ण संदर्भ दाखवत नाही. मी हिंदू आहे हिंदुत्ववादी आहे. मला माझ्या धर्माचा आदर आहे. मी सगळ्यांसाठी सारखं काम करते. मोदीजींनी लेक लाडकी योजना, लखपती दीदी आणली आहे. या धर्म जातीवर नाहीत मुस्लिम महिलांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. 

पार्टीने केलेली चूक लोक समजतात. लोकांमध्ये संभ्रम नाही तर रोष आहे. त्याचा नकली हिंदुत्ववादी चेहरा जगाला माहिती आहे. पत्थरबाजी झाली तेव्हा ते कुठेही नव्हते. हे सगळं झाल्यावर आम्ही अमन शांती यात्रा कडून म्हणून म्हणाले. त्यांचा फंडिंग कुठे कुठे झालं. दर्गा मध्ये झालेला आहे. आता चौकाला टिपू सुलतान असं नाव त्यांनी सुचवलेला आहे. हिंदुत्ववादी विचार यांनी दुखावला आहे. माझ्यावर धर्मासाठी घेतलेल्या दोन केसेस आहेत. हिंदू आहे कोण नकली हिंदू आहे हे लोकांना कळतं. तुम्ही असली हिंदुत्ववादी कुठला चान्स दिला नाही आणि नकली हिंदुत्ववादी ला चान्स दिला.

लोकांचा विश्वास ज्या नेत्यावर असतो त्याला कुठल्याही पक्ष आणि कुठल्याही तिकीट लागत नाही. मी २०१९ ला निवडून येऊन आधीच दाखवला आहे. ही जनता माझा पक्ष आणि माझा संघटन आहे. पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवला असता तर मी उत्तम संघटन केलं असतं. माझ्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणूक ही झाली नाही. ज्यामुळे दुसऱ्या फळीची तयारी मला करता आली नाही. जास्तीत जास्त तरुणाई आणि महिलांना मला वर आणायचे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com