SBI Amrit Kalash Yojana
SBI SchemeSaam Tv

Amrit Kalash Yojana: स्टेट बँकेची ४०० दिवसांची जबरदस्त योजना! गुंतवणूकीवर मिळणार भरघोस व्याज; जाणून घ्या सविस्तर

Amrit Kalash Yojana: स्टेट बँक ऑफ इंडियाची ४०० दिवसांची अमृत कलश ही एफडी योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला भरघोस व्याज मिळणार आहे.
Published on

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते. अनेकजण सरकारी योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना, बँकांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना हीदेखील गुंतवणूकीसाठी बेस्ट आहे. (SBI Amrut Kalash Yojana)

SBI Amrit Kalash Yojana
Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

अमृत कलश ही एक एफडी योजना आहे.या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना चांगले व्याजदर मिळते. अमृत कलश योजनेत तुम्हाला फक्त ४०० दिवसांसाठी गुंतवणूक करायची आहे.कमीत कमी दिवस गुंतवणूक करुन चांगला परतावा देणारी ही उत्तम योजना आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेच्या या योजनेत गुंतवणूक ही सुरक्षित असणार आहे. या योजनेत नागरिकांना ७.१० टक्के व्याजदर दिले जाते. तर ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के जास्त व्याज मिळते.

अमृत कलश ही ४०० दिवसांची एफडी योजना आहे.या योजनेतआतापर्यंत अनेक लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ही योजना नागरिकांसाठी खूप फायदेशीर आहे. (SBI Amrut Kalash Yojana Of 400 Days)

SBI Amrit Kalash Yojana
Post Office Scheme: फक्त व्याजातून १२ लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; एकदा कॅलक्युलेशन जाणून घ्याच!

अमृत कलश योनेसोबतच स्टेट बँकेची अमृत वृष्टी हीदेखील योजना आहे.४४४ दिवसांसाठी ही योजना आहे. या योजनेत ७.२५ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात.या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. ही योजनादेखील फायदेशीर आहे. (SBI Amrut Vrishti Yojana)

SBI Amrit Kalash Yojana
PM Mudra Scheme: दिवाळीत व्यवसाय सुरु करायचाय? सरकार देतंय २० लाखांपर्यंत लोन; कसं ते घ्या जाणून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com