Ayushman Arogya Yojana: फक्त ८५० रुपये भरा अन् ३५ लाखांपर्यंत उपचार मिळवा; आयुष्मान आरोग्य योजना नक्की आहे तरी काय?

Rajasthan Government Ayushman Arogya Yojana : केंद्र सरकारने आतापर्यंत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. राजस्थान सरकारच्या आयुष्मान आरोग्य योजनेअंतर्गत तुम्हाला ३५ लाखांपर्यंत उपचार मिळणार आहेत.
Ayushman Arogya Yojana
Ayushman Arogya YojanaSaam Tv
Published On

प्रत्येकाने निरोगी राहणे खूप महत्त्वाचे असते. आयुष्यात कितीही पैसे असले तरीही जर तुमच्याकडे उत्तम आरोग्य नसेल तर त्याचा काही फायदा होत नाही. सध्याच्या काळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण सावध असणे गरजेचे असते. वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायला हवी. राजस्थान सरकारच्या योजनेत तुम्ही फक्त ८५० रुपयांची गुंतवणूक करुन ३५ लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.

राजस्थान सरकारच्या या योजनेत तुम्ही ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करु शकतात. या योजनेअंतर्गत काय फायदा होणार आहे?जाणून घ्या. (Government Scheme)

Ayushman Arogya Yojana
PM Internship Scheme: केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; पीएम इंटर्नशिप योजना नक्की आहे तरी काय?

राजस्थान सरकारच्या मुख्यमंत्री आयुष्मान आरोग्य योजनेअंतर्गत तुम्ही ३५ लाख रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकतात. या योजनेत राजस्थानमधील नागरिकांना या योजनेअंतर्गत कॅशलेस सुविधांचा लाभ गेता येणार आहे. या योजनेअंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या लोकांना १ नोव्हेंबरपासून या योजनेचा लाभ मिळणार आहे. राजस्थानमधील मोठ्या शहरांपासून ते लहान गावातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कुटुंबांना २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि १० लाखांचा अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेत खाजगी आणि सरकारी रुग्णालयात लाभ मिळणा आहे. या योजनेअंतर्गत, लहान, अत्यल्प शेतकरी, कंत्राटी कामगार, असहाय्य कुटुंबासाठी हा विमा मिळणार आहे. (CM Ayushman Arogya Yojana)

Ayushman Arogya Yojana
PM Mudra Scheme: आता बिनधास्त सुरु करा स्वतः चा व्यवसाय; सरकार देतंय २० लाखांचं कर्ज; काय आहे योजना?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करु शकतात. ८५० रुपये अर्ज शुल्क भरुन तुम्ही अर्ज करु शकतात. नोंदणी करण्यासाठी तुम्ही जन आधार कार्ड, आधार कार्ड ही कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील.

Ayushman Arogya Yojana
Government Scheme: सरकारची भन्नाट योजना! फक्त २ रुपयांचा प्रिमियम भरा अन् २ लाखांचा इन्शुरन्स मिळवा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com