केंद्र सरकारने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांअंतर्गत तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शिक्षण करताना तुम्हाला इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ३ ऑक्टोबरपासून रजिस्ट्रेशन सुर झाले आहे. (PM Internship Scheme For Students)
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ५ वर्षांसाठी राबवण्यात आली आहे. ५०० कंपनींमध्ये १ कोटी तरुणांना इंटर्नशिप मिळणार आहे. यासाठी सरकारने अनेक कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. जवळपास २४ सेक्टरमध्ये ८० हजारपेक्षा जास्त इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे.
२१ ते २४ वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप मिळणार आहे. पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा.त्याचसोबत तो कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसावा. ग्रॅज्युएशन किंवा १२ वी पास झालेले तरुण शिक्षणासोबत इंटर्नशिप करु शकतात.ऑनलाइन कोर्स करणारे तरुणदेखील या योजनेत अर्ज करु शकतात.या योजनेअंतर्गत तरुणांना सरकारकडून ४५०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. तसेच ६००० रुपयांचे अनुदानदेखील दिले जाणार आहे.या योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी अभ्यासासोबत रोजगाराचीदेखील संधी निर्माण होणार आहे. (PM Internship Scheme)
या योजनेअंतर्गत १९३ कंपन्यांमध्ये १२ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु झाली आहे.ज्युबिलंट फूडवर्क्स, मारुती सुझुकी इंडिया, आयशर मोटर्स, लार्सन अँड टुर्बो, मुथूट फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात नोकरी मिळण्यासाठी खूप फायदा होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.