दिल्ली, ता. २३ जुलै २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करत असून सरकारने १ कोटी तरुणांना टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्यासंदर्भातील मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.
नव्या एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होत असून यामध्ये युवकांसाठी सर्वात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार ४.१ कोटी तरुणांना रोजगारासाठी पाच योजना आणणार आहे. येत्या ५ वर्षात सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकार 1 कोटी तरुणांना मोठ्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देणार आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला 6000 रुपयांच्या अतिरिक्त भत्त्यासह 5000 रुपये भत्ता दिला जाणार आहे.
तसेच सर्व क्षेत्रांमध्ये पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना सरकार दोन वर्षांसाठी दरमहा ३०० रुपये अतिरिक्त पीएफ देणार आहे. EPFO मध्ये नोंदणीकृत प्रथमच कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण 15,000 रुपयांपर्यंत असेल. युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. 30 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते.
उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, नियोक्ते आणि कर्मचारी दोघांनाही प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेचा 30 लाख तरुणांना फायदा होणार असून अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत, सरकार EPFO मध्ये योगदानासाठी नियोक्त्यांना दरमहा 3000 रुपये प्रतिपूर्ती पुढील दोन वर्षांसाठी देईल. या योजनेचा लाभ 50 लाख लोकांना होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.