Dharashiv News : तुळजापूर तालुक्यात ५ हजारांवर बोगस मतदार नोंदणी अर्ज; बनावट आधार कार्डचा वापर

Dharashiv News : नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नवमतदार नोंदणी अर्ज भरले जात आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच या नोंदणीला सुरवात करण्यात आली आहे
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणी सुरु आहे. प्रशासनाकडून हि नोंदणी केली जात आहे. दरम्यान धाराशिवमध्ये बनावट आधार कार्डच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करत बोगस मतदार नोंदणी अर्ज दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नवमतदार नोंदणी अर्ज भरले जात आहे. विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच या नोंदणीला सुरवात करण्यात आली आहे. मात्र हि नोंदणी करताना बोगस प्रकारे अर्ज दाखल करून घेण्याचे काम केले जात असल्याचे समोर आले आहे. धाराशिवच्या तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील हंगरगा (नळ) इथं पहिल्यांदा हे बनावट नोंदणी अर्ज आढळून आले होते. 

Dharashiv News
Bhandara News : बस चालक व एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल; साकोली आगारातील प्रकार, व्हिडिओ झाला व्हायरल

मतदारसंघात ५ हजार बोगस नोंदणी 

यानंतर संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पडताळणी केल्यानंतर तब्बल पाच हजारांहून अधिक बोगस मतदार नोंदणी अर्ज आढळून आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने दाखल हे अर्ज बिएलओ स्तरावर मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेले हे अर्ज नामंजूर केले आहेत. प्रशासन वेळीच सतर्क झाल्याने बोगस मतदार नोंदणीला आळा बसला आहे. तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी सर्वप्रथम यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र बोगस मतदार नोंदणी करणारा मास्टरमाइंड कोण? हे शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com