Post Office Scheme: एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला ५००० रुपये मिळवा; पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना आहे तरी काय?

Post Office Monthly Saving Scheme: प्रत्येकजण आपले भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करुन दर महिन्याला पैसे मिळवू शकतात.
Post Office Scheme
Post Office SchemeSaam Tv
Published On

काहीच दिवसात दिवाळी सुरु होणार आहे. दिवाळीला अनेकजण एकमेकांना गिफ्ट देतात. या दिवाळीला तुम्ही तुमच्यासाठी आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करु शकतात. जेणेकरुन भविष्यात कधीच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पैशाची गरज भासणार नाही. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळणार आहे.पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ७.४ टक्के व्याजदर मिळणार आहे. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहे. (Post Office Monthly Saving Scheme)

Post Office Scheme
Lakhpati Didi Scheme : खुशखबर! लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकीचा मॅच्युरिटीचा कालावधी ५ वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांची गुंतवणूक करुन खाते उघडू शकतात.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकीची मर्यादा ९ लाख रुपये आहे. जर तुमचे जॉइंट अकाउंट असेल तर तुम्ही या योजनेत १५ लाख रुपये गुंतवू शकतात. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला महिन्याला उत्पन्न सुरु होणार आहे.

या योजनेत तुम्ही मॅच्युरिटीआधी अकाउंट बंद करु शकत नाही. जर तुम्ही तीन वर्षाच्या आधी पैसे काढले तर तुम्हाला २ टक्के चार्ज द्यावे लागणार आहे. तर ५ वर्षांच्या आधी अकाउंट बंद केले तर १ टक्के चार्ज द्यावा लागणार आहे. (Post Office Scheme)

Post Office Scheme
New Scheme: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 'आयुष्मान'मध्ये आरोग्य पॅकेज करणार लाँच; कधी सुरु होणार नवी योजना?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि मासिक उत्पन्न मिळवा. या योजनेत जर तुम्ही ५ वर्षांसाठी ५ लाखांची गुंतवणूक केली तर त्यावर ७.४ व्याजदर लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ३,०८४ रुपये महिन्याला मिळणार आहेत. तसेच तुम्ही जर योजनेत ९ लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ५,५५० रुपये मिळतील.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागणार आहे. तिथे तुम्हाला फॉर्म भरुन केवायसी करावे लागणार आहे. तसेच पॅन कार्ड , आधार कार्ड असे आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

Post Office Scheme
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला मिळणार २०००० रुपये; कसं? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com