Government Jobs 2024 [Updates]: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्ट ऑफिस ते सरकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Check Latest Sarkari Naukri Alert / Government Jobs in July 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारी बँक ते पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु आहे.
Government Jobs 2024 [Updates]: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्ट ऑफिस ते सरकारी बँकेत विविध पदांसाठी भरती;  जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
Government JobSaam TV

जर तुमचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. सध्या पोस्ट ऑफिस ते सरकारी बँकामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. अनेक ठिकाणी नोकरीसाठी तुम्ही अर्ज करु शकतात. अगदी १० वी पास ते ग्रॅज्युएशन पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे.

इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या ३५ हजार पदांसाठी नोकरीची संधी आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु सकतात. १५ जुलैपूर्वी तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी १८ ते ४० वर्ष वयोगट आहे.

Government Jobs 2024 [Updates]: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्ट ऑफिस ते सरकारी बँकेत विविध पदांसाठी भरती;  जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
Government Job: सरकारी शिक्षक होण्यासाठी सुवर्णसंधी; २६२९ पदांसाठी भरती, अर्ज कुठे आणि कसा करावा? जाणून घ्या

SSC CGL पदांसाठी भरती सुरु आहे.यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी ssc.gov.in या साइटला भेट द्यावी लागेल. १८ ते ३२ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

IBPS लिपिक भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकासाठी लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड केली जाते. पदवी पास उमेदवार २१ जुलैपर्यंत अर्ज करु शकतात. यासाठी एकूण ६१२८ पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यास ४७,००० रुपये मासिक वेतन मिळेल.

Government Jobs 2024 [Updates]: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्ट ऑफिस ते सरकारी बँकेत विविध पदांसाठी भरती;  जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
Bank Job: जनता सहकारी बँकेत लिपिक पदांसाठी भरती; मिळणार ३० हजार रुपये पगार; अर्ज कुठे आणि कसा करावा? जाणून घ्या

याचसोबत मुंबई उच्च न्यायलय, पंजाब नॅशनल बँकेत मोठी भरती सुरु आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या पदांसाठी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. त्याचसोबत आयडीबीआय बँकेत ३१ पदांसाठी भरती सुरु आहे.

Government Jobs 2024 [Updates]: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्ट ऑफिस ते सरकारी बँकेत विविध पदांसाठी भरती;  जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
State Bank Of India Recruitment 2024 : स्टेट बँकेत नोकरीची मोठी संधी! 'या' पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com