SBI Recruitment 2024 Eligibility: स्टेट बँकेत नोकरीची मोठी संधी! 'या' पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

State Bank Of India Job Recruitment 2024 Eligibility Criteria: जर बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे तर स्टेट बँकेत काही पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
SBI Recruitment 2024: स्टेट बँकेत नोकरीची मोठी संधी! 'या' पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या
State Bank Of India Job Opening 2024Saam Tv
Published On

आपल्यापैंकी अनेक तरुणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. जर तुम्हीही बँकेत नोकरी शोधत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी. सध्या SBI मध्ये निघालेल्या काही पदांसाठी तुम्ही अर्ज करु शकता. या पदासाठी ३ जुलैपासून नोंदणी सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही २४ जुलै २०२४ आहे. चला तर अर्ज कसा भरायचा आणि या पदांसाठी असलेले सर्व माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात.

SBI Recruitment 2024: स्टेट बँकेत नोकरीची मोठी संधी! 'या' पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या
Government Job Recruitements: सरकारी नोकरीची संधी; यूनियन बँक, MahaTranscoc मध्ये ७३६ जागांसाठी भरती

अनेक पदांसाठी असलेली भरती

या भरती प्रक्रियेद्वारे स्टेट बँक(Bank) ऑफ इंडियामध्ये तब्बल १६ पदांची भरती होणार आहे. या पदांसाठी असलेली भरती प्रक्रियेचा तपशील संपूर्ण खालीलप्रमाणे आहे. या भरती प्रक्रियेत ''वरिष्ठ उपाध्यक्ष अर्थात(IS ऑडिटर) ची २ पदे आहेत तर सहाय्यक उपाध्यक्ष(ISऑडिटर)ची ३ पदे आहेत तर व्यवस्थापकाची एकूण ४ पदे आहेत शिवाय उपव्यवस्थापकाची ७ पदे या व्दारे ''भरण्यात येणार आहेत.

कोणते उमेदवार अर्ज करु शकतात ?

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निघालेल्या पदांसाठी अर्ज करण्याची उमेदवारांची पात्रता पदानुसार आहे. यासाठी माहिती (Information)तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्टरुमेंटेशनमध्ये बीई किंवा बीटेक पदवी असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. या सर्वांशिवाय उमेदवाराला विविध पदानुसार काही पात्रता निकष असले पाहिजेत आणि त्याच्या असलेल्या क्षेत्रातील अनुभव देखील अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी असलेलेल्या मधील वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी कमीत कमी ३८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतो तर सहाय्यक उपाध्यक्षपदासाठी ३३ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. यातील व्यवस्थापक पदासाठी वय वर्षे २८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच डेप्युटी मॅनेजर(manager) पदासाठी साधारण २५ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या वेबसाइटवरुन करु शकता अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर sbi.co.in/web/careers या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता. या वेबसाइटवर तुम्हाला संपूर्ण अर्ज प्रक्रिया माहिती पडेल.

शुल्क आकारणी

दिलेल्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी जर सामान्य तसेच EWS तर OBC या श्रेणीतील उमेदवारांना साधारण ७५० रुपये शुल्क(charge) भरावे लागतील. तर SC, ST, PH श्रेणीतील उमेदवारांना शुल्क कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

वेतन

निवड झालेल्या व्यवस्थापकाचे वेतन हे ८५ ते १ लाख ५२ हजार प्रति महिना तर उपव्यवस्थापक पदासाठी वेतन हे ६४ हजार ते ९३ हजार रुपये प्रति महिना असेल. शिवाय असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट पदासाठी वर्षाला ४० लाख रुपये पगार असेल.

SBI Recruitment 2024: स्टेट बँकेत नोकरीची मोठी संधी! 'या' पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या
AIIMS Delhi Jobs Recruitment 2023 : तरुणांसाठी खुशखबर! सरकारी खात्यात नोकरीची सुवर्णसंधी, ३ हजार जागा रिक्त, कसा कराल अर्ज?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com