Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला मिळणार २०००० रुपये; कसं? जाणून घ्या सविस्तर

Post Office Senior Citizen Scheme: पोस्ट ऑफिसने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. ज्येष्ठ नागरिक बचत योजना नागरिकांना सर्वाधिक व्याज मिळते.
Post Office Scheme
Post Office SchemeSaam Tv
Published On

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारी किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात पैशाची अडचण येणार नाही. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना म्हणजे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात फायदा होतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला काही ठरावीक अमाउंट मिळणार आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही पाच वर्षांपर्यंत २०,५०० रुपये मिळवू शकतात. (Post Office Scheme)

Post Office Scheme
Agnipath Scheme : ड्युटीवर असताना अग्निवीराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना काय मिळतं? अग्निपथ योजनेचे काय आहेत नियम?

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही दर महिन्याला २० हजार रुपये कमवू शकतात. या योजनेत आतापर्यंतचे सर्वात जास्त ८.२ टक्के व्याजदर दिले जाते. हे व्याजदर तिमाही आधारावर दिले जाते. या योजनेत मॅच्युरिटी पाच वर्षांची असते.परंतु त्यानंतरही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत ६० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक एकरकमी गुंतवणूक करु शकतात.

या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत जर तुम्ही ३० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला २,४६,००० रुपयांचे व्याज प्रत्येक वर्षाला मिळेल. त्यामुळे या योजनेत तुम्हाला नियमित इन्कम मिळणार आहे. (Post Office Senior Citizen scheme)

Post Office Scheme
PM Internship Scheme : ९०,८०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी, आजपासून नोंदणी सुरू; कुठे आणि कसा कराल अर्ज, वाचा सविस्तर

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस योजनेत किंवा बँकेत जाऊन अरज करावा लागेल. या योजनेत ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात.

Post Office Scheme
APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com