APY SCHEME
APY SCHEMEGOGGLE

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

APY Scheme: सरकारने नागिकांसाठी अटल पेन्शन योजना चालू केली आहे. यामुळे या योजनेचा लाभ सर्व वयोगटातील नागरिकांना होणार आहे. या बातमीमुळे नागरिकांना अटल पेन्शन योजने बाबतचे काही नियम समजणार आहेत.
Published on

रोजच्या जीवनात प्रत्येक नागरिक काहीनां काही कामे किंवा नोकरी करताना पाहायला मिळतात. काम केल्यावर त्याबदल्यात प्रत्येकाला पगार देखील मिळतो. त्याचबरोबर प्रत्येकाला मिळालेल्या पैशांची बचत देखील करायची असते. योग्य ठिकाणी गुंतवणूक करुन त्या मोबदल्यात चांगली रक्कम देखील हवी असते. पण बचत कशी करायची यासाठी नागरिक वेगवेगळ्या योजना शोधत असतात. अशाच नागरिकांसाठी सरकारने अटल पेन्शन योजना चालू केली आहे.

अटल पेन्शन योजनेचा लाभ १८ ते ४० वयोगटातील नागरिक घेऊ शकता. नागरिकांसाठी ही योजना एक उत्तम गुंतवणूक आहे. सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांना अटल पेन्शन योजनेचा पुरेपुरे लाभ घेता येणार आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास सरकार नागिकांना पैशांची हमी देत आहे. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूकदारांचा आकडा ७ कोटी झाला आहे. आता सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी २०२४ ते २०२५ च्या वर्षात ५६ लाख ग्राहक जोडले गेले आहेत. यामुळे नागरिकांचा विश्वास अटल योजनेबाबत अजून वाढला आहे. नागरिकांनी जर थोडीशी गंतवणूक केली, तर त्यांना पुढे आर्थिकदृष्या खूप मदत होऊ शकते. नागरिकांच्या थोड्या गंतवणूकीवर त्यांना 1,000 ते 5,000 पर्यंत पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

APY SCHEME
Post Office Saving Scheme : 115 महिन्यात पैसे होणार दुप्पट; पोस्ट ऑफिसची खास योजना, जाणून घ्या सविस्तर

अटल पेन्शन योजनेचे काही नियम

अटल पेन्शन योजनेमध्ये नागरिकांनी २० वर्षे तरी गुंतवणूक करायला हवी. ग्राहकाचे वय १८ असेल, तर त्यांना अटल योजनेत महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील आणि प्रति दिवस रोज फक्त 7 रुपये भरावे लागतील. यानंतर त्या ग्राहकाला ६० वर्षानंतर 5000 पेन्शन मिळू शकते. नागरिकांना जर 1,000 रुपये पेन्शन हवी असेल तर, महिन्याला त्यांना ४२ रुपये भरावे लागतील. जर नागरिक ४० वर्षांचे असतील तर त्यांनी त्या वयात गुंतवणूक केली असेल, तर त्यांना पुढे ६० वयात पेन्शन मिळेल. या योजनेचा लाभ विविाहीत जोडप्यांना देखील घेता येणार आहे. विवाहित जोडप्याला निवृत्तीनंतर महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. अन्यथा पती- पत्नीमधील पतीचा मृत्यू काही वर्षापूर्वी झाला असेल तर, त्यांमधील पत्नीला या योजनेची सुविधा मिळेल. पती- पत्नीच्या मृत्यूनंतर या अटल पेन्शन योजनेचा लाभ नॅामिनिला होणार आहे. नॅामिनी व्यक्तीली गंतवणूक केल्याचे सर्व पैसे परत मिळतील.

नागरिकांनी एपीवाय स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना कर सवलतीचा देखील लाभ मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे एक बैंक खाते असणे आवश्यक आहे. त्याचबरोर ते बैंक खाते आधार कार्डशी लिंक आणि अर्जदाराकडे मोबाईल क्रंमाक असावा , याची खात्री नागरिकांनी करुन घ्यावी. याबरोबर एपीवाय स्कीमचा लाभ घेण्यासाठी नागरिकाचे या अगोदर अटल पेन्शनमध्ये खाते नसावे.

APY SCHEME
Ladaki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना आमचीच; पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले? पाहा Video
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com