Post Office Saving Scheme : 115 महिन्यात पैसे होणार दुप्पट; पोस्ट ऑफिसची खास योजना, जाणून घ्या सविस्तर

Post Office Saving Scheme news : 115 महिन्यात पैसे दुप्पट होणारी पोस्ट ऑफिसची खास योजना आहे. या योजनेविषयी जाणून घ्या.
Post Office
Post OfficeSaam Tv
Published On

Post Office Scheme : तुम्हाला तुमचं भविष्य आर्थिकरित्या सुरक्षित ठेवू इच्छित आहात का? तुम्हाला एखाद्या गुंतवणुकीतून पैसे दुप्पट करायचे आहेत का? तुमचं उत्तर हो असेल. तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची खास योजना आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांसाठी खास योजना बाजारात आणली. या योजनेतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेतून गुंतणूक केलेले काही महिन्यांचे पैसे दुप्पट होऊ शकतात.

पैसे होणार दुप्पट

तुम्हाला चांगला परतावा हवाय? तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत जोखीम कमी आहे. या योजनेतून तुम्हाला पैसे दुप्पट करण्याची संधी आहे. तुम्हाला किसान विकास पत्र योजनेतील गुंतवणुकीवर ७.५ टक्क्यापर्यंत व्याज मिळू शकतो.

Post Office
Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला सिंगल किंवा जॉइंट खाते उघडावे लागेल. जॉइंट खात्यात तीन लोक सामील होऊ शकतात. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमीत कमी १००० रुपयांची गुंतवणूक करू शकता. तसेच या खात्याला तुम्ही वारसदारांचंही नाव जोडू शकता. यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किसान विकास पत्र योजनेसाठी खाते उघडावे लागेल.

किसान विकास पत्र योजनेसाठी तुम्ही कमीत कमी ५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. या तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास ११५ महिन्यात पैसे दुप्पट होऊ शकतात. तुम्हाला या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर ७.५ टक्के व्याज मिळतं. तुम्ही या योजनेत ५ लाखांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला ११५ महिन्यात १० लाख रुपये मिळू शकतात.

Post Office
Tax Saving Tips: खुशखबर! वर्षाला १० लाख कमावले तरीही भरावा लागणार नाही टॅक्स; आकडेमोड समजून घ्या

कोण अर्ज करू शकतो?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. प्रोढ व्यक्तींना अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अर्ज भरण्यास मुभा आहे. अर्ज केल्यानंतर तुम्हाला किसान विकास प्रमाणपत्र दिलं जाईल. तुम्हाला हे प्रमाणपत्र सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा योजनेची मुदत संपेल, तेव्हा तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com