Maharashtra Monsoon Session: मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार देवदर्शन; CM शिंदेंकडून 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने'ची घोषणा

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.
Maharashtra Monsoon Session: मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार देवदर्शन; CM शिंदेंकडून 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने'ची घोषणा
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live:Saam Digital
Published On

सुनिल काळे| मुंबई, ता. २९ जून २०२४

राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलावर्ग, शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांसाठी अनेक मोठ्या योजनांच्या घोषणा केल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजने'ची घोषणा केली असून या योजनेमधून राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा!

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्याचे सांगितले.

Maharashtra Monsoon Session: मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार देवदर्शन; CM शिंदेंकडून 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने'ची घोषणा
Maharashtra Politics: 'प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा', ठाकरेंच्या खासदाराचे काँग्रेस हायकमांडला पत्र; मविआमध्ये नवा वाद?

ज्येष्ठ नागरिकांन घडवणार देवदर्शन!

तसेच "महाराष्ट्र ही संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Maharashtra Monsoon Session: मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार देवदर्शन; CM शिंदेंकडून 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने'ची घोषणा
VIDEO: 'ठेकेदारांच्या डोक्यातून आलेला मार्ग', 'शक्तिपीठ महामार्गा'वरुन सतेज पाटील कडाडले; विधान परिषदेत जुगलबंदी!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com