VIDEO: 'ठेकेदारांच्या डोक्यातून आलेला मार्ग', 'शक्तिपीठ महामार्गा'वरुन सतेज पाटील कडाडले; विधान परिषदेत जुगलबंदी!

Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates: नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला विदर्भ, कोकण तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला.
VIDEO: 'ठेकेदारांच्या डोक्यातून आलेला मार्ग', 'शक्तिपीठ महामार्गा'वरुन सतेज पाटील कडाडले; विधान परिषदेत जुगलबंदी!
Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates:Saamtv
Published On

सुनिल काळे|मुंबई, ता. २९ जून २०२४

नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला विदर्भ, कोकण तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत या मुद्दावरुन आक्रमक भूमिका घेत महामार्ग रद्द झालाच पाहिजे असा इशारा दिला. या गोंधळानंतर विधान परिषदेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

बंटी पाटील आक्रमक!

"शक्तिपीठ महामार्ग हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. २० दिवसात अधिकाऱ्यांनी माहिती जमा केली आणि अधिसूचना काढण्यात आली. ठेकेदारासाठी हा रस्ता बनवला जातोय. या मार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे? असा सवाल करत शक्तिपीठ महामार्गाची मागणीच नाही त्यामुळे गरज नसताना रस्ता कशाला?" असे म्हणत सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

"ठेकेदारांच्या सुपीक डोक्यातून आलेला हा महामार्ग आहे. या मार्गावर जमिनी कुणी घेतल्या आहेत का? कुणाची समृद्धी होणार आहे? याचा खुलासा झाला पाहिजे. हा रस्ताच रद्द झाला पाहिजे. आजपर्यंत कोणत्या रस्त्याला विरोध केला नाही. मात्र हा रस्ता रद्द झाला पाहिजे. यामागे कोण हुजूर आहे ते जाहीर करावे," असेही सतेज पाटील म्हणाले.

VIDEO: 'ठेकेदारांच्या डोक्यातून आलेला मार्ग', 'शक्तिपीठ महामार्गा'वरुन सतेज पाटील कडाडले; विधान परिषदेत जुगलबंदी!
Maharashtra Politics: 'प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा', ठाकरेंच्या खासदाराचे काँग्रेस हायकमांडला पत्र; मविआमध्ये नवा वाद?

दादा भुसेंचे उत्तर

"या महामार्गाच्या संदर्भात ज्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक आंदोलन झाली आहेत. म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, तसेच एमएसआरडीच्या वतीने लोकप्रतिनिधी यांच्या भावना जाणून पुढची दिशा ठरवली जाईल. जनभावनेच्या विरोधात कुठलंही काम केलं जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन पुढची पाऊल उचलली जातील," असे उत्तर दादा भुसे यांनी दिले.

VIDEO: 'ठेकेदारांच्या डोक्यातून आलेला मार्ग', 'शक्तिपीठ महामार्गा'वरुन सतेज पाटील कडाडले; विधान परिषदेत जुगलबंदी!
Pune Accident VIDEO : पुण्यात पुन्हा भीषण अपघात, अल्पवयीन मुलाने टँकर चालवला; पती-पत्नीसह अनेकांना उडवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com