गल्लीच्या कोपऱ्यावर ड्रग्ज मिळू लागलेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव : सतेज पाटील

congress leader satej patil worries about pune city law and order: वडगावच्या उपोषणकर्त्यांची तसेच ज्यांवर आराेप केले जाताहेत त्यांची प्रशासनाने बाजू ऐकावी. ज्याची चूक आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. एकतर्फी निर्णय होता कामा नये, तीन महिन्यानंतर सरकार बदलणार आहे असे सतेज पाटील यांनी नमूद केले.
congress leader satej patil worries about pune city law and order
congress leader satej patil worries about pune city law and orderSaam Tv
Published On

- रणजीत माजगांवकर

काेल्हापूरनंतर पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर काॅंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्यात खुलेआम ड्रग्स मिळत असल्याने पुण्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही असे पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. ड्रग्स आता सर्रास पानपट्टी पान सुपारी ज्या पद्धतीने मिळतात त्या पद्धतीने गल्लीच्या कोपऱ्यावर ड्रग्स मिळत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान शक्तीपीठ महामार्ग किंवा प्रीपेड विज मीटर संदर्भात सरकारची भूमिका दुटप्पी असल्याची टीका सतेज पाटील यांनी केले. या संदर्भात सरकारने स्पष्टपणे बोलावे असेही त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादन करणार नाही असे दादा भुसे यांनी म्हटल्याने याचा अर्थ रस्ता करण्याची भूमिका त्यांची आहे. शक्तिपीठ रस्त्याची एवढीच काळजी असेल तर प्रत्येक शक्तिपीठाला पाच हजार कोटी रुपये द्यावेत अशी मागणी सतेज पाटलांनी केली.

congress leader satej patil worries about pune city law and order
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2024: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 6 जुलैला सातारा जिल्ह्यात हाेणार आगमन;जाणून घ्या वेळापत्रक

सतेज पाटील म्हणाले तुळजापूर, पंढरपूर, अंबाबाई ही जी शक्तिपीठ आहेत तिथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा द्याव्यात. शक्तिपीठ महामार्गाने प्रीपेड मीटर लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिक्षा चालकांना पासिंग संदर्भात पन्नास रुपयांचा दंड ही भूमिका घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली

Edited By : Siddharth Latkar

congress leader satej patil worries about pune city law and order
Amboli Waterfall: आंबाेली घाटात धबधब्यावर पर्यटकांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO बघा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com