Pune Accident VIDEO : पुण्यात पुन्हा भीषण अपघात, अल्पवयीन मुलाने टँकर चालवला; पती-पत्नीसह अनेकांना उडवलं

Pune Wanwadi Tanker Accident : पुणे शहरातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशाच प्रकारची एक संतापजनक घटना घडली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुसाट वेगाने टँकर चालवत अनेकांना उडवलंय.
Pune Wanwadi Tanker Accident
Pune Wanwadi Tanker AccidentSaam TV

पुणे शहरातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशाच प्रकारची एक संतापजनक घटना घडली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुसाट वेगाने टँकर चालवत अनेकांना उडवलंय. या अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नीसह व्यायामासाठी निघालेले लहान मुलेही जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शहरातील वानवाडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांच्या पत्नी हे दुचाकीवरून वानवाडी परिसरातून जात होते.

त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. त्याचवेळी अचानक पाठीमागून भरधाव वेगात एक टँकर आला. काही क्षणातच या टँकरने ढुमे यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, की ढुमे यांच्या पत्नी दुचाकीवरून खाली कोसळल्या. दैव बलवंतर असल्याने त्यांच्या अंगावरून टँकरचे चाक गेले नाही.

Pune Wanwadi Tanker Accident
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, दोन कार एकमेकांना धडकल्या; ६ जण जागीच ठार, ४ जखमी

पुढे या टँकरने मॉर्निंग वॉकला निघालेल्या लहान मुलांनाही धडक दिली. या अपघातात काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या १४ वर्षांचा मुलगा चालवीत होता. अपघातानंतर नागरिकांनी हा टँकर अडवून धरला तसेच चालकाला पकडून ठेवले.

या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Pune Wanwadi Tanker Accident
VI Recharge Plan : मोबाइल वापरकर्त्यांना तगडा झटका; Jio अन् Airtel नंतर आता वोडाफोन-आयडियानेही रिचार्ज प्लॅन वाढवले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com