Investment Tips: पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना; गुंतवणूकदारांना मिळणार दरमहा उत्पन्न

Post Office Yojana: आपण गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असतो. पोस्ट ऑफिसच्या योजना जबरदस्त परतावा देतात.
Post Office Yojana
Post Office Yojana Saam Tv

Post Office Monthly Income Scheme

पोस्ट ऑफिस योजनांमधील सुरक्षितता आणि हमीमुळे (Investment Tips) नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक बचत योजना आहेत. यामधील एका योजनेबाबत आज आपण जाणून घेऊ या. देशातील लोकसंख्येचा विचार करून पोस्ट ऑफिसने विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. (latest sarkari yojana)

पोस्ट ऑफिसमध्ये अनेक बचत योजना आहेत. परंतु मासिक उत्पन्न योजना गुंतवणूकदारांना दरमहा उत्पन्न देते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत, तुम्ही एकटे किंवा संयुक्त खाते उघडू शकता. या योजनेत (Post Office Yojana) तुम्ही एकरकमी रक्कम जमा करून दरमहा एक निश्चित रक्कम मिळवू शकता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करू शकता. ही रक्कम किमान ५ वर्षांसाठी ठेवली (Post Office Monthly Income Scheme) जाते. जमा केलेल्या पैशांवर मिळणाऱ्या व्याजातून दरमहा उत्पन्न मिळते. जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत हे खाते उघडले आणि १५ लाख रुपये जमा केले तर तुम्ही दरमहा ९,२५० रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता. ९ लाख रुपयांच्या ठेवीवर दरमहा ५५०० रुपयांचं व्याज मिळतं.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत सध्या ७.४ टक्के दराने व्याज दिलं जात आहे. या योजनेत कोणताही नागरिक खाते उघडू शकतो. तुम्ही मुलाच्या नावानेही खाते उघडू शकता. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक सामील होऊ शकतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते उघडण्यासाठी घराचा पत्ता, फोटो ओळखपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Post Office Scheme) आणि जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्मसह दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सबमिट करावे लागतील.

Post Office Yojana
Kisan Vikas Patra Yojana | भरघोस व्याजासोबत पैसे दुप्पट करून देणारी Post Office ची योजना!

पोस्ट ऑफिस योजनेत परताव्याची हमी

पोस्ट ऑफिस (Post Office) मासिक उत्पन्न योजनेमध्ये ५ वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. जर तुम्हाला काही गरजेमुळे मध्येच पैसे काढायचे असतील तर तुम्ही खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर पैसे काढू (Utility News) शकता. यासाठी तुम्हाला काही अतिरीक्त शुल्क भरावा लागेल. एक ते तीन वर्षात पैसे काढले तर एकूण ठेवीपैकी २ टक्के रक्कम कापली जाते.

तीन वर्षांनंतर आणि ५ वर्षापूर्वी पैसे काढण्यासाठी १ टक्का शुल्क आकारले जातं. मॅच्युरिटीवर ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळते. तुम्हाला मॅच्युरिटीनंतरही पैसे काढायचे नसतील तर तुम्ही ते पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा जमा करू शकता.

Post Office Yojana
Stree Shakti Yojana: महिलांना व्यवसायात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारची जबरदस्त योजना, मिळणार २५ लाखांचं कर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com