Shraddha Thik
तुम्हालाही स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? जाणून घ्या...
स्वत:चा व्यवसाय करायचा आहे, अशा लोकांसाठी ही योजना आहे.
या योजनेत व्यवसाय करण्यासाठी तरूणांना कर्ज दिले जाते. या योजनेंतर्गत आधारकार्डवर कर्ज दिले जाईल. या योजनेची मुदतवाढ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
व्यवसाय करण्यासाठी स्वनिधी योजनेंतर्गत एखाद्याने घेतलेली कर्जाची रक्कम वेळेनुसार परत केली, तर ती व्यक्ती दुसऱ्यांद्या त्याच्या दुप्पट पैसे घेऊ शकते.
नियमित कर्ज फेडणाऱ्यास प्रोत्साहन देण्यासाठी ७ टक्के वार्षिक दराने व्याज अनुदान दिले जाते.
तुम्ही फेरीवाले किंवा street vendor/ पथ विक्रेते असाल तर या योजनेचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
या योजनेचा लाभ pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही १० हजार किंवा २० हजारांच्या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.