Shraddha Thik
आज संपुर्ण भारतात 28 फेब्रुवारी रोजी चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त तुम्ही मुंबईतील 'नेहरू सायन्स सेंटर'ला भेट देऊ शकता. जाणून घ्या येथे जाण्यासाठी कसा असेल खर्च.
हे भारतातील सर्वात मोठे परस्पर विज्ञान सेंटर आहे. या सेंटरला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे.
'नेहरू सायन्स सेंटर' हे मुंबईतील वरळी येथे आहे. येथे सुरवातीला 'लाइट अँड साईट' उघडले.
सार्वजनिक वाहतुकीने म्हणजे ट्रेन, बस, टॅक्सी किंवा खाजगी वाहनांनीही पोहोचता येईल. जवळचे रेल्वे स्टेशन महालक्ष्मी (वेस्टर्न) आणि भायखळा (मध्य रेल्वे). जवळचे बसस्थानक जिजामाता नगर आहे.
विज्ञान सेंटर प्रवेशाचे तिकीट - ₹ ७०/-
3D विज्ञान - ₹ ३०/-
सायन्स फिल्म शो - ₹ १०/-
प्रवेश तिकीट फक्त सायन्स पार्क - ₹ २०/-
2 व्हीलर - ₹ 30/-
4 चाकी - ₹ 50/-
दररोज सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांसह, दोन दिवस वगळता वर्षभर खुले असते.