Success Story: डॉक्टर बनायचे स्वप्न झाले भंग, सुरु केलं मॉडेलिंग, नंतर दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS झालेल्या तस्कीन खान यांची यशोगाथा

Success Story Of IAS Taskeen Khan: यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा देण्यासाठी खूप मेहनत आणि अभ्यासात सातत्य ठेवावे लागते. आयएएस तस्कीन खान यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला यश हे मिळतेच. यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. ही क्रॅक करण्यासाठी दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. परंतु या प्रवासात अनेकदा अडथळे येतात. परंतु कितीही अडथळे आले तरीही आपण त्यातून मार्ग काढायचा असतो. असंच काहीसं IAS तस्कीन खान यांच्या आयुष्यात घडलं.

IAS तस्कीन खान यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले.तस्कीन खान यांना आयुष्यात खूपवेळा अपयश मिळालं तरीही त्या खचल्या नाही. त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केले. त्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Success Story
Success Story: जंगली म्हणून चिडवलं, स्पर्धा परिक्षेत फेल; हार मानली नाही, जिद्दीनं व्यवसायात उतरला, आज लाखो रुपये कमावतो

डॉक्टर बनायचे होते स्वप्न

मिडिया रिपोर्टनुसार, तस्कीन यांनी मेडिकल फिल्डमध्ये करिअर करायचे होते. यासाठी त्यांनी नीटची परीक्षादेखील दिली होती. परंतु घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी मेडिकल फील्डमध्ये करिअर न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. एके काळी त्या प्रोफेशनल मॉडेलदेखील होत्या. तस्कीन यांनी पुढे मॉडेलिंग करिअर सोडून आयएएस बनण्याचा निर्णय घेतला.

Success Story
Farmer Success Story : पाच एकर अद्रक शेतीतून भरघोस उत्पादन; पारंपरिक शेतीला फाटा

तीन वेळा अपयश

तस्कीन खान यांनी तीन वेळा यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) दिली. परंतु त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. परंतु २०२२ मध्ये त्यांनी ७३६ रँक मिळवत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांच्या प्रयत्नाला शेवटी यश मिळाले.

तस्कीन या बास्केटबॉल चॅम्पियन होत्या. त्याचसोबत त्या नॅशनल लेव्हलला डिबेटरदेखील होत्या. त्यांनी २०१६-१७ मध्ये मिस उत्तराखंड आणि मिस देहारादून किताब पटकावला आहे. त्यांना पुढे विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा होता. परंतु काही कारणांनी ते शक्य झाले नाही.

Success Story
Phullwanti Success Party : फुलवंती अन् चंद्राची जुगलबंदी; चाहत्यांच्या नजरा खिळल्या, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com