Success Story: जंगली म्हणून चिडवलं, स्पर्धा परिक्षेत फेल; हार मानली नाही, जिद्दीनं व्यवसायात उतरला, आज लाखो रुपये कमावतो

Success Story Of Businessman Satyam Sundaram: बिहारच्या सत्यम सुंदरम यांनी बांबूच्या प्रोडक्ट्सचा स्वतः चा व्यवसाय सुरु केला. आज या व्यवसायातून ते २५ लाख रुपये कमावतात.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्यावर जो व्यक्ती मात करुन सातत्याने प्रयत्न करतो तो यशस्वी ठरतो. असंच यश बिहाच्या सत्यम सुंदरम यांना मिळालं आबे. सत्यम सुंदरम यांना लहानपणी खूप लोकांनी चिडवले होते. काही लोकांनी तर त्यांना जंगली म्हणून देखील चिडवले होते. तरीही सत्यम सुंदरम यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय सुरु केला. (Success Story Of Satyam Sundaram)

सत्यम सुंदरम यांनी मणिपुरी बांबू आर्टिफॅक्ट्स नावाचा व्यवसाय सुरु केला. रस्त्याच्या बाजूला छोटासा व्यवसाय सुरु केला होता. ते आज २५ लाख रुपयांची वार्षिक कमाई करतात.

सत्यम सुंदरम यांची कंपनी टूथब्रश, पेन स्टँड, नेकपीस, विविध कलाकृती, लँपशेड, टेम्परेचर डिस्प्ले यांसारखे प्रोडक्ट्स (Bamboo Products) तयार करते. त्यांचे हे प्रोडक्ट्स तेलंगणा, केरल, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली येथे विकले जातात.

Success Story
Farmer Success Story : मुरमाड शेतजमिनीतून ऊसाचे विक्रमी उत्पादन; आधुनिक पद्धतीने केली मशागत

सत्यम सुंदरम हे मूळचे बिहारचे. त्यांनी लखनपुर येथील सरकारी शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले. ते गोणीत भरुन पुस्तके शाळेत घेऊन जायचे. त्यांच्या वडिलांची पोर्णियाला बदली झाली. त्यामुळे त्यांना तिथे शिफ्ट व्हावे लागले. ते शाळेत हुशार नव्हते. अनेकदा ते नापासदेखील झाले होते. त्यामुळे त्यांना फेलियर म्हणून चिडवायचे. कॉन्वेंट शाळेत तर त्यांना जंगली म्हणूनदेखील चिडवले.

सत्यम हे उच्च शिक्षणासाठी कोलकत्ता येथे गेले. त्यांनी बीसीए डिग्री प्राप्त केली. बिहारच्या तरुणांवर सरकारी नोकरी करण्यासाठी दबाव होता. त्यामुळेच त्यांच्या वडिलांचीदेखील आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी, अशी इच्छा होती. या दबावामुळे त्यांचे एका महिन्यात तब्बल १० किलो वजन कमी झाले होते. त्यांनी राज्यातील PCS परीक्षा दिली. परंतु ते या परिक्षेत पास झाले नाही. त्यानंतर त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

२०२० साली त्यांनी एमबीएसाठी (MBA) अॅडमिशन घेतले. त्यांचा हा निर्णय एकदम योग्य होता. त्यांनी एमबीएच्या काळात खूप चांगले लक्ष दिले. या काळात त्यांनी कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन आणि मार्केटिंग स्कीलवर लक्ष दिले. यानंतर त्यांनी ब्रिटानिया आणि आयटीसी लिमिटेड यांसारख्या कंपनीत इंटर्नशिपदेखील केली. त्यांनी चांगली प्री प्लेसमेंट ऑफरदेखील मिळाली होती. (Success Story Of MBA Graduate)

Success Story
Success Story: शाळेसाठी ७० किमीची पायपीट, वडिलांसोबत विकला चहा, जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS हिमांशु गुप्तांचा प्रेरणादायी प्रवास

नोकरी करण्यापेक्षा सत्यम सुंदरम यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. त्यांना कॉलेजच्या काळात बांबू उद्योगाबद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी लहान भावाकडून १५,००० रुपये घेतले होते. त्यांनी एका रस्त्याच्या बाजूला व्यवसाय सुरु केला. त्यांनी येथे बांबूच्या १० बॉटल ठेवल्या होत्या. लोकांना पर्यावरणपूरक या गोष्टींचे खूप नवल वाटले. त्यामुळे त्यांच्या स्टॉलवर खूप गर्दी व्हायची. २०२२ मध्ये त्यांना प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमअंतर्गत ८ लाखांची मदत मिळाली. त्यामुळे त्यांनी स्वतः ची कंपनी सुरु केली.

Success Story
Success Story: आजोबांचे जुने काम पुन्हा सुरु; आज तरुण करतोय कोटींची कमाई, सिबी मणिवन्नन यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com