
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला अपयश हे येते. परंतु कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करतो तो यशस्वी होतोच. असंच अश आयएएस ऑफिसर हिमांशु गुप्ता यांना मिळालं आहे. हिमांशु गुप्ता यांचे वडिल मजुर होते. खूप खडतर परिस्थितीत त्यांनी अभ्यास करुन खूप मोठे यश मिळवले आहे.
हिमांशु गुप्ता यांचे बालपण खूप गरीबीत गेले. त्यांनी शाळेत जाण्यासाठी रोज ७० किमी प्रवासदेखील केला. तसेच वडिलांना मदत करण्यासाठी ते वडिलांसोबत चहाच्या दुकानातदेखील काम करायचे. परंतु खडतर परिस्थितीतही त्यांनी अभ्यास करणे सोडले नाही. त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस होऊन दाखवले. (IAS Himashu Gupta Success Story)
हिमांशु गुप्ता यांचे वडिल मजुर आहेत. त्यांचे वडिल साक्षर नव्हते तरीही त्यांनी कधीही मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर सोडली नाही. चहाच्या दुकानावर हिमांशु यांच्या वडिलांनी स्वतः चे घर चालवले. त्यांनी आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी खूप मेहनत घेतली. (UPSC Success Story)
हिमांशु गुप्ता यांनी २०१८ साली पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा क्लिअर केली. त्यानंतर त्यांची रेल्वे वाहतूक सेवेत (IRTS) साठी निवड झाली. त्यांनी पुन्हा एकदा २०१९ साली परीक्षा दिली. यावेळी त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली. त्यानंतर २०२० साली त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. तेव्हा ते आयएएस ऑफिसर झाले.
हिमांशु गुप्ता हे रोज शाळेत जाण्यासाठी ३५ किमीचा प्रवास करायचे. त्यामुळे एकूण ७० किमी प्रवास ते रोज करायचे. त्यांचे मित्र रोज शाळेतील वॅनने प्रवास करायचे.त्यावेळी त्यांना एक दिवस शाळेतील मित्रांनी त्यांना चहाच्या स्टॉलवर पाहिले. तेव्हापासून त्यांना चिडवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मोठ्या जिद्दीने खूप प्रयत्न केले आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.