Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv

Dharashiv News : दहावीच्या परीक्षा केंद्रासाठी तडवळेकरांचा रस्त्यावर ठिय्या; शाळेला टाळे ठोकत केले गाव बंद

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील तडवळे गावात दहावीपर्यंतची शाळा आहे. मात्र परीक्षा केंद्र नाही. परीक्षेसाठी येथील मुलांना ढोकी येथील परीक्षा केंद्रावर जावं लागतं
Published on

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: गावात दहावीपर्यंतची शाळा आहे. मात्र मुलांना परीक्षेसाठी परगावी जावं लागतं. या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळा येथील ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकत गावबंद आंदोलन केलं. तसेच काही काळ ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला.

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील तडवळे गावात दहावीपर्यंतची शाळा आहे. मात्र परीक्षा केंद्र नाही. परीक्षेसाठी येथील मुलांना ढोकी येथील परीक्षा केंद्रावर जावं लागतं. परीक्षेला जात असताना अनेक अपघाताच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे (SSC Exam) दहावीचे परीक्षा केंद्र गावातच असावं; अशी गावकऱ्यांची मागणी आहे. या मागणीची दखल घेतली जात नसल्याने संतप्त होत गावकऱ्यांनी आज शाळेला टाळे ठोकत गावबंद आंदोलन केलं. 

Dharashiv News
Radhakrishna vikhe Patil : मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती कोणाला; राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टच सांगितले

विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलन 

परीक्षा केंद्रासाठी लागणारी पटसंख्या शाळेची आहे. आजूबाजूच्या गावातूनही विद्यार्थी तडवळा येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दहावीची बोर्ड परीक्षा गावातच व्हावी; अशी मागणी यावेळी करण्यात आली. गावाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत गावात येण्यास बंदी करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com