Radhakrishna vikhe Patil
Radhakrishna vikhe PatilSaam tv

Radhakrishna vikhe Patil : मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती कोणाला; राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टच सांगितले

Shirdi News : पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद आहे. मला दिलेल्या संधीत मी चांगल काम करून दाखवलय.
Published on

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत. मात्र ते नाराज असण्याचे काही कारण वाटत नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल, तो मी मान्य करील अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. शिवाय मुख्यमंत्री पदासाठी आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांनाच आहे; असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe Patil) मतदारसंघात सक्रीय झाले असून लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली; यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कि ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद आहे. मला दिलेल्या संधीत मी चांगल काम करून दाखवलय. तो विश्वास पुन्हा पक्ष नेतृत्व व्यक्त करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री पदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाच आहे. त्यामुळे वेगळ मागण्याचे कारण नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्याबद्दल विश्वास असून निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

Radhakrishna vikhe Patil
Jalgaon News : रात्री वडिलांकडून पार्सल नेले अन् थोड्यावेळात आली मृत्यूची बातमी; दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

जनाधार गमावला हे मान्य करावे 
विधानसभेत पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याच काम सुरू आहे. त्यामुळे या पळवाटा शोधण्याचे काम ते करत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जनाधार गमावलाय ते कुठ तरी मान्य करा. उद्धव ठाकेरेंनी मोदी आणि शहा यांच्यावर बेताल विधान केली. एवढ बेताल विधान करणारा मी पाहिला नाही. मुळात त्याचे शासन त्यांना लोकांनी दिले असल्याचे विखे पाटील म्हणाले. तसेच बच्चु कडूंना महायुती सरकारने पाठबळ दिलं. धोरण मान्य केली, दिव्यांगाची धोरण मान्य केली. त्याच्याशी प्रतारणा करून बच्चु कडू यांनी जो विश्वासघात दाखवला. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामिल करून घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. 

Radhakrishna vikhe Patil
Bribe Case : पोलीस प्रशासनात खळबळ; १५ हजारांची लाच घेताना दोन पोलिस कर्मचारी ताब्यात

तेव्हा ईव्हीएमवर शंका का नाही 
लोकसभेत आघाडीला घवघवीत यश मिळाले. महायुतीची पिछेहाट झाली, त्यावेळी EVM वर का शंका व्यक्त केली नाही? ईव्हीएमवर  विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा देवून टाकायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट भाषेत सांगितलय. जनमत बाजुने असल की ईव्हीएम चांगलं आणि विरोधात गेल की ईव्हीएम वाईट. शरद पवार जाणते राजे आहेत. त्यांनी जनाधार गमावलाय त्यांनी आता घरी बसाव. लोकांचे वाटोळ तुम्ही केले. आता जनता आणि राज्याचे आणखी वाटुळं करू नका; अशा शब्दात विखे पाटलांची शरद पवारांवर टिका केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com