Surabhi Jayashree Jagdish
स्वप्न शास्त्रानुसार, पहाटे 3 ते पहाटे 5 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात आणि त्या वेळी पाहिलेली स्वप्नं खूप शुभ असतात.
स्वप्न शास्त्रानुसार, ब्रह्म मुहूर्तावर कोणती स्वप्नं खूप शुभ असतात.
लहान मुलांना स्वप्नात खेळताना पाहणे खूप शुभ मानले जाते. या स्वप्नामुळे जीवनात सुख-समृद्धी येते.
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात गुलाबाचं फूल दिसणं खूप शुभ मानलं जातं. याचा अर्थ तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
जर तुम्हाला स्वप्नात चमकणारा दिवा दिसला तर समजून घ्या की देव तुमच्यावर कृपा करणार आहे. यामुळे तुम्हाला लवकर संपत्ती मिळू शकते.
जर तुम्हाला स्वप्नात गंगा नदी दिसली तर त्याचा अर्थ तुमचं नशीब चमकणार आहे. यावेळी तुम्हाला बाकीचे पैसे मिळणार आहेत.
जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज दिसले तर समजा तुमचे नशीब चमकणार आहे.
सकाळी रिकाम्या पोटी लवंगाच्या पाणी प्यायल्याने शरीरात काय होतात बदल?