सकाळी रिकाम्या पोटी लवंगाच्या पाणी प्यायल्याने शरीरात काय होतात बदल?

Surabhi Jayashree Jagdish

मसाले

भारतीय स्वयंपाकघरात आढळणारे मसाले हे चवीसोबतच आरोग्यासाठीही महत्त्वाचे असतात.

लवंग

सकाळी रिकाम्या पोटी लवंगाच्या पाण्याचे सेवन करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.

फायदे

सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात आणि काय फायदे मिळतात ते पाहूयात.

पचन

जे लोक सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पितात, त्यांची पचनक्रिया मजबूत होते. या पाण्यामुळे गॅस, ॲसिडीटी, सूज येणं, अपचन यांसारखे पोटाचे आजार बरे होतात.

पोटात जळजळ

जर तुम्हाला पोटात जळजळ होण्याची समस्या असेल तर लवंगाच्या पाण्याच्या सेवनाने आराम मिळू शकतो.

इम्युनिटी

लवंगाचं पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

वाघापूर्वी भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण होता माहितीये का? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

tiger | saam tv
येथे क्लिक करा