ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या आवडीनुसार तुम्ही फिराल, नवनविन गोष्टी पाहाल. असा लांबचा प्रवास कराल
कामात चपळपणा दाखवणे फायदेशीर राहील. आज जोखमीचे काम हाती येईल.
कामाच्या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्याल. तुमचे वर्चस्व राहील.
भोळे भाबडे पणा तुम्हाला महागात पडेल. सगळे करून हाती करवंटी येईल.
आपल्याच डामडौलात राहायला आज आपल्याला आवडेल. प्रेमामध्ये यश मिळेल.
घरी पाहुण्यांची उठबस राहील. कदाचित गावाकडच्या जमिनी, व्यवहार यांचे बोलणे होईल.
शेजारी संबंध वाढतील. छोटे प्रवास घडतील. मनासारखा दिवस जाण्याचे आज योग आहेत.
पैशाची निगडीत गुंतवणूक करताना अनेक वाईट अनुभव येतील. मात्र निसंकोचपणे गुंतवणूक करायला हरकत नाही.
कामाचे श्रेय आपल्याला आज मिळेल. पगार वाढीची शक्यता आहे.
इतरांच्या इच्छेनुसार वागायचा प्रयत्न कराल. मात्र लोकांचे म्हणणे मनाला लावून घेवू नका.
ठरवून केलेल्या गोष्टींमध्ये आज यश मिळेल. आज स्नेह भोजनाचे योग आहेत.
सद्गुरुंची विशेष कृपा राहील. कामात धावपळ होईल मात्र यश पदरात पडेल. आपल्या कर्माला आज आपण प्राधान्य द्याल.