Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला किती वर्ष महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य; काय आहे अट?

Ladki Bahin Yojana Eligibility: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला किती वर्ष महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्य अट म्हणजे महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे. जर महिला महाराष्ट्राची रहिवासी नसेल तर त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाही. परंतु जर एखादी महिला लग्न करुन महाराष्ट्रात आली असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार का असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी किती वर्ष महाराष्ट्राचे रहिवासी असावे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. आज आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत.

लाडकी बहीण योजना अटी (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे आधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. लाभार्थी महिलेकडे जर आधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी १५ वर्षांपूर्वी रेशन कार्ड असले तरी चालेल.

महिलांकडे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला या चार कागदपत्रांपैकी एकतरी कागदपत्र असणे गरजेचे आहे.

परराज्यात जन्मलेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न केले असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. या परिस्थितीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

कुटुंबातील अविवाहित महिलादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्याच कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. या योजनेत आता लाभार्थी महिलांची पडताळणी सुरु आहे. पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. (Ladki Bahin Yojana)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT