Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

Shreya Maskar

हेल्दी बिया

तुम्हाला हाय बीपी आणि हृदयविकाराची समस्या असेल तर आपल्या डाएटमध्ये बियांचा समावेश करा. हाय बीपी कंट्रोल करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणत्या बिया फायदेशीर जाणून घेऊयात.

Healthy Seeds | pinterest

हाय बीपी- हार्ट अटॅक

हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी जवस आणि चिया सीड्स सर्वात फायदेशीर मानल्या जातात.

Heart Attack | pinterest

पोषक घटक

जवस आणि चिया सीड्समध्ये अल्फा-लिनोलेनिक ॲसिडचे प्रमाण सर्वाधिक असते. हे एक वनस्पती-आधारित ओमेगा-३ फॅटी ॲसिड आहे, जे धमन्यांची सूज कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यासाठी ओळखले जाते.

High BP | pinterest

जवस

जवस उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी खूपच फायदेशीर आहे. जवसाच्या बिया पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी प्या.

Flaxseeds | pinterest

जवस बियाचे फायदे

जवस खाल्ल्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब या दोन्हीमध्ये लक्षणीय घट होते. त्यामध्ये लिग्नॅन्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात.

Benefits of Flaxseeds | pinterest

चिया सीड्स

चिया सीड्स धमन्यांच्या लवचिकतेसाठी फायदेशीर आहे. यामध्ये ओमेगा-३ फॅट्स, मॅग्नेशियम आणि विद्राव्य फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि धमन्या कडक होण्यापासून रोखण्यास मदत करतात.

Chia Seeds | pinterest

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करतात. त्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच यातील नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना शिथिल करून त्यांचा विस्तार करते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

Pumpkin Seeds | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढतेय, सुरुवातीची 'ही' लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...