Shreya Maskar
तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. यामागे बदलती जीवनशैली, मधुमेह, लठ्ठपणा, दीर्घकालीन ताण या समस्या आहेत.
अस्वास्थ्यकर आहार, बैठी जीवनशैली, अति-प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड आणि साखरयुक्त पेय तसेच डेस्क किंवा स्क्रीनसमोर बराच वेळ बसल्याने धमन्यांमध्ये लवकर प्लाक जमा होतो. रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
फास्ट फूड आणि जंक फूडमध्ये तरूण मुलांना मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे लहान वयातच हृदयावर ताण येतो आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.
खराब आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे तरुण मुलांमध्ये उच्च रक्तदाब आणि वाढलेले एलडीएल कोलेस्ट्रॉल दिसून येत आहे, ज्यामुळे हृदयाचे स्नायू हळूहळू जाड होतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.
आजकाल धूम्रपान करणे ही एक फॅशन झाली आहे. तरुण मुलं काहीतरी कुल करायचे म्हणून धूम्रपान करायला सुरुवात करतात आणि त्यांना त्याची सवय लागते. सिगारेटचा वापर आणि ई-सिगारेटच्या वाढत्या वापरामुळे रक्तवाहिन्यांच्या अस्तरांचे गंभीर नुकसान होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते.
कामाच्या ठिकाणी टेन्शनचे वातावरण, चिंता आणि झोपेची कमतरता यामुळे कॉर्टिसोलसारखे तणाव संप्रेरक वाढतात, ज्यामुळे दाह आणि उच्च रक्तदाब होतो.
हृदयासंबंधित आजारांचा कौटुंबिक इतिहास असल्यामुळे देखील हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतो. आनुवंशिकता कोलेस्टेरॉल वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.