Maharashtra Politics : महायुती सरकारचा शपथविधी होताच मंत्रिमंडळाची होणार पहिली बैठक? मोठे निर्णय घेण्याची शक्यता

Maharashtra Political News : महायुती सरकारचा शपथविधी होताच मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
maharashtra politics
mahayuti Saam Tv
Published On

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई : महायुतीचा सत्तेस्थापनाचा पेच सुटला आहे. महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सत्तेस्थापनाचा दावा केला. महायुती सरकारचा शपथविधी उद्या गुरवारी शपथविधी होणार आहे. या सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधीनंतर महायुती सरकारची उद्या मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत यंदा महायुतीची त्सुनामी पाहायला मिळाली. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला. महायुतीच्या यशापुढे महाविकास आघाडीची गाडी ४६ जागांवर थांबली. निवडणुकीतील अभूतपूर्वक यशानंतर महायुतीने तातडीने सत्तास्थापनेसाठी पावले उचली. मात्र, महायुतीमध्ये खातेवाटपात ११ दिवस गेले. तरी त्यात पूर्णत तोडगा निघालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

maharashtra politics
Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज महायुतीने सत्तेस्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला. तसेच त्यानंतर पत्रकार परिषदेत महायुतीने देवेंद्र फडणवीस होणार, असल्याचेही जाहीर केले. महायुतीच्या उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात पहिली बैठक होणार आहे.

maharashtra politics
Maharashtra Politics: महायुतीचं अखेर ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार होणार उपमुख्यमंत्री

या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीकडून मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेविषयी काय निर्णय घेतला जातो, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर रामदास आठवले काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यामुळे आज त्यांची भेट घेण्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणाहून नागरिक मुंबईतील सागर बंगल्यावर गर्दी करताना पाहायला मिळाले. रामदास आठवले यांनीही सागर बंगल्यावर हजेरी लावली.

maharashtra politics
Maharashtra Politics: विधानसभेला काँग्रेसला अपयश का आलं? महिला खासदारांनी राहुल गांधींना सांगितली कारणं

यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. आमचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत त्यामुळे आम्ही परदेशातील लोकांना सुद्धा बोलवू. संजय राऊत यांनी टीका करण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सुद्धा उद्यासाठी बोलावलं आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर त्यांचा मान सन्मान आणखी वाढला असता रामदास आठवले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com