Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Konkan To Akkalkot Bus Service Update News : कोकणातील स्वामी समर्थ भक्तांसाठी आनंदाची बातमी! मालवणहून अक्कलकोटसाठी थेट एसटी बससेवा सुरू झाली आहे. बसचे वेळापत्रक, मार्ग, ऑनलाइन आरक्षण, महिलांसाठी ५०% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची संपूर्ण माहिती येथे वाचा.
MALVAN TO AKKALKOT DIRECT ST BUS SERVICE STARTED | MSRTC ROUTE, TIMINGS, ONLINE BOOKING & DISCOUNTS
MALVAN TO AKKALKOT DIRECT ST BUS SERVICE STARTED | MSRTC ROUTE, TIMINGS, ONLINE BOOKING & DISCOUNTSSaam Tv
Published On
Summary
  • कोकणातील स्वामी समर्थ भक्तांना मोठा दिलासा

  • मालवण ते अक्कलकोट थेट एसटी बससेवा सुरू

  • बस दररोज दुपारी ३.४५ वाजता मालवणहून तर सायंकाळी ७.३० वाजता अक्कलकोटहून सुटणार

  • प्रवाशांसाठी ऑनलाइन आरक्षण, महिलांना ५०% सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास उपलब्ध

कोकणातील स्वामी समर्थ भक्तांसाठी गुड न्यूज! आता कोकणातून काही तासात बसने अक्कलकोटला पोहचता येणार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मालवण आगारातून अक्कलकोटसाठी थेट एसटी बससेवा सुरू केली आहे. या नव्या सेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच मार्गावरील इतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी अक्कलकोटला जाण्यासाठी प्रवाशांना बस बदलावी लागत होती. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. मात्र, आता थेट बससेवा उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सदर बस दररोज दुपारी ३.४५ वाजता मालवण आगारातून अक्कलकोटकडे रवाना होईल. तसेच परतीच्या प्रवासासाठी बस अक्कलकोट येथून सायंकाळी ७.३० वाजता मालवणकडे परत येईल. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचा मार्गही महत्त्वाच्या शहरांमधून ठेवण्यात आला आहे.

MALVAN TO AKKALKOT DIRECT ST BUS SERVICE STARTED | MSRTC ROUTE, TIMINGS, ONLINE BOOKING & DISCOUNTS
Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

मालवण, आचरा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर या प्रमुख स्थानकांवरून ही बस धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या बससाठी ऑनलाइन आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे घरबसल्या तिकीट आरक्षित करण्याची सोय मिळाली आहे.

MALVAN TO AKKALKOT DIRECT ST BUS SERVICE STARTED | MSRTC ROUTE, TIMINGS, ONLINE BOOKING & DISCOUNTS
Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

नागरिकांसाठी आनंदाची बाब म्हणजे महिलांना या प्रवासाच्या तिकिटात ५० टक्के सवलत मिळणार असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध असेल. या नव्या बससेवेमुळे सिंधुदुर्ग ते अक्कलकोट आणि सोलापूरदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, विशेषतः स्वामी समर्थ भक्तांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

MALVAN TO AKKALKOT DIRECT ST BUS SERVICE STARTED | MSRTC ROUTE, TIMINGS, ONLINE BOOKING & DISCOUNTS
Ticket Booking : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा; मिनिटांत होईल कन्फर्म

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com