Ladki Bahin Vs Lek Ladki: लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये तर लाडक्या लेकींना १ लाख रुपये; दोन्ही योजनांमध्ये फरक काय?

Ladki Bahin Vs Lek Ladki Yojana: महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणि लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आणि मुलींना आर्थिक मदत केली जाते.
Ladki Bahin Vs Lek Ladki
Ladki Bahin Vs Lek LadkiSaam Tv
Published On

राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून ही योजना राबवण्यात येणार आहे. महिलांसोबतच मुलींसाठीही योजना राबवण्यात आली आहे. मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षांची होईपर्यंत १ लाख रुपये दिले जातात. लेक लाडकी योजना नक्की काय आहे? जाणून घेऊया.

राज्य सरकारने २०२३ पासून लेक लाडकी योजना सुरु केली. ही योजना माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुधारित योजना आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासाठी, मुलींना सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मुलींनी शिकावे आणि बालविवाह रोखणे हे आहे. (Ladki Bahin Vs Lek Ladki Yojana)

Ladki Bahin Vs Lek Ladki
Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुली १८ वर्षांच्या होईपर्यंत १ लाख रुपये दिले जातात. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींना हे पैसे दिले जातात. मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये तर ती पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये दिले जातात. मुलगी ६वीत गेल्यात ७ हजार रुपये दिले जातात. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ७५ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे मुली १८ वर्षांच्या होईपर्यंत १ लाख १ हजार रुपये दिले जातात. (Lek Ladki Yojana)

योजनेचा लाभ कोणाला मिळणार? (Lek Ladki Yojana Application)

पिवळ्या व केशरी रंगाचे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील फक्त २ मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. २०२३ नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे.

Ladki Bahin Vs Lek Ladki
Lek Ladki Yojana: मुलींना मिळणार १ लाख रूपये, पात्रता काय? कोणती कागदपत्रे लागणार? बघा

कागदपत्रे

या योजनेत अर्ज करण्यासाठी मुलीचा जन्मदाखला, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, पासबुक, रेशन कार्ड, शाळेचा दाखला असणे गरजेचे आहे. त्याचसोबत या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे लग्न झालेले नसावे.

Ladki Bahin Vs Lek Ladki
EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com