Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

PM Vidyalaksmi Yojana: केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन मिळणार आहे.
Government Scheme
Government Schemeyandex
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने महिलांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठीदेखील अनेक योजना राबवल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी अशीच एक योजना केंद्र सरकारने राबवली आहे. या योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात एज्युकेशन लोन मिळणार आहे.

अनेकदा विद्यार्थ्यांना पुरेसे पैसे नसल्याने उच्च शिक्षण घेता येत नाही.परंतु केंद्र सरकारच्या विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत तुम्हाला शिक्षणासाठी कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना किती लोन मिळणार आहे याबाबत सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.(PM Vidyalaksmi Yojana For Students)

Government Scheme
PM Mudra Scheme: दिवाळीत व्यवसाय सुरु करायचाय? सरकार देतंय २० लाखांपर्यंत लोन; कसं ते घ्या जाणून

भारत सरकारने प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत लोन मिळते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे. त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते.या योजनेत ज्या कुटुंबाचे उत्पन्न ४.५ लाख आहे त्यांना बिननव्याजी कर्ज मिळणार आहे. पंरतु यासाठी काही अटी आहे. त्या तुम्ही वेबसाइटवर जाऊन चेक करा.(Education Loan)

ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे.

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत जे विद्यार्थी सरकारी कॉलेजमधून शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाते.प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत १० लाखांपर्यंत लोन मिळते.तसेच १० लाखांच्या लोनवर ३ टक्के सब्सिडीदेखील दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न ४.५ टक्के आहे त्यांना व्याजातून सूट मिळणार आहे. (PM Vidyalaksmi Yojana)

Government Scheme
PMJAY Scheme: 5 लाख रुपयांचा विमा मोफत कसा मिळणार? जाणून सर्व प्रक्रिया

योजनेचा लाभ कसा घ्यावा?

पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही https://www.vidyalakshmi.co.in/Students/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करा. त्यानंतर कॉमन एज्युकेशन लोन अॅप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे.

Government Scheme
Government Scheme: महिलांची 'ही' खास योजना बंद होणार, सरकारचा निर्णय, गुंतवणुकीसाठी उरले फक्त १२० दिवस!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com