Mahila Sanman Saving Certificate Scheme
Government SchemeSaam Tv

Government Scheme: महिलांची 'ही' खास योजना बंद होणार, सरकारचा निर्णय, गुंतवणुकीसाठी उरले फक्त १२० दिवस!

Mahila Sanman Saving Certificate Scheme: केंद्र सरकार महिला सेव्हिंग सर्टिफिकेट योजना बंद करणार आहे. मार्च २०२५ पर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकतात.
Published on

Central Government: केंद्र सरकारने महिलांसाठी खास महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना राबवली आहे. ही योजना आता पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये बंद होऊ शकते. महिल सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेत तुम्ही मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेत महिलांना चांगला परतावा मिळतो. या योजनेत आतापर्यंत ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.या योजनेत एफडीपेक्षाही जास्त व्याजदर मिळते. या योजनेत गुंतवणूकीवर कोणत्याही प्रकारची जोखिम नसते. (Mahila Sanman Saving Certificate Scheme Will Close)

Mahila Sanman Saving Certificate Scheme
PM Internship Scheme: केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; पीएम इंटर्नशिप योजना नक्की आहे तरी काय?

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट (Mahila Sanman Saving Certificate) योजनेत वर्षाला ७.५ टक्के व्याजदर मिळते. हे व्याज तिमाही आधारावर दिले जाते. जर तुम्ही २ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला २,३२,०४४ रुपये मिळतील. या योजनेत फिक्स्ड रिटर्न मिळते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनात १८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील महिला खाते उघडू शकतात. तुम्ही तुमच्या मुलीच्या नावानेदेखील खाते उघडू शकतात.कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत तुम्ही खाते उघडू शकतात. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँकेत तुम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात.

Mahila Sanman Saving Certificate Scheme
Government Scheme: व्यवसाय सुरु करा, कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांचे कर्ज; पीएम विश्वकर्मा योजना नक्की आहे तरी काय?

अटी व नियम

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपये गुंतवू शकतात. तर जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. २ वर्षासाठी तुम्ही ही रक्कम गुंतवू शकतात. या योजनेत आप्तकालीन परिस्थितीत जर पैसे काढायचे असतील तर एका वर्षानंतर ४० टक्के रक्कम काढू शकतात.

Mahila Sanman Saving Certificate Scheme
Post Office Scheme: सरकारचा मोठा निर्णय! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत आता व्याज मिळणार नाही, तुम्हीही केली होती का गुंतवणूक?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com