Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

Shruti Vilas Kadam

चहापत्तीपासून तयार करा नैसर्गिक हेअर कलर

चहापत्तीमध्ये असलेले नैसर्गिक टॅनिन केसांना गडद छटा देण्यास मदत करतात. त्यामुळे केमिकलशिवाय केसांना रंग देण्याचा हा सोपा पर्याय ठरू शकतो.

hair | freepik

साहित्य

दोन ते तीन चमचे चहापत्ती, दोन कप पाणी आणि आवश्यक असल्यास एक चमचा कॉफी पावडर वापरू शकता. कॉफीमुळे रंग अधिक गडद दिसण्यास मदत होते.

Hair | pinterest

तयार करण्याची पद्धत

पाण्यात चहापत्ती चांगली उकळा. पाणी अर्धे होईपर्यंत उकळल्यानंतर गाळून पूर्ण थंड होऊ द्या.

Hair Colour

केसांवर कसे लावावे?

केस स्वच्छ धुवून चहापत्तीचे पाणी ब्रश किंवा कापसाच्या मदतीने मुळांपासून टोकापर्यंत लावा. एक तास तसेच ठेवून नंतर साध्या पाण्याने धुवा.

Hair Colour

अधिक चांगल्या परिणामासाठी

आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय केल्यास केसांवर नैसर्गिक गडद छटा दिसू लागते. नियमित वापर केल्यास परिणाम अधिक चांगले मिळू शकतात.

Hair | yandex

केसांना मिळतात अतिरिक्त फायदे

चहापत्ती केसांना रंग देण्यासोबतच चमक वाढवण्यास, केस मऊ ठेवण्यास आणि केसांचा निस्तेजपणा कमी करण्यासही मदत करू शकते.

Hair Colour

वापरताना घ्या ही काळजी

हा उपाय करण्यापूर्वी त्वचेवर पॅच टेस्ट करा. कोणतीही अॅलर्जी किंवा त्रास जाणवल्यास वापर थांबवा. नैसर्गिक उपायांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो.

Hair Colour

Weight Loss: वजन कमी करायचंय पण भातही खायचाय? दुपार की रात्री...; भात कधी खाल्ल्यास मिळतो जास्त फायदा

Weight Loss | Saam Tv
येथे क्लिक करा