Shruti Vilas Kadam
वजन कमी करण्यासाठी भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत भात खाल्ल्यास तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
रात्री एका वाटीइतका भात पुरेसा असतो. जास्त प्रमाणात भात खाल्ल्यास अतिरिक्त कॅलरी शरीरात जमा होऊ शकतात.
भातासोबत डाळ, कडधान्य, पनीर, अंडी किंवा चिकन यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ल्यास अधिक वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
भातासोबत हिरव्या भाज्या आणि सॅलड खाल्ल्याने फायबरचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
शक्य असल्यास ब्राऊन राईस किंवा हातसडीचा तांदूळ निवडा. यात फायबर अधिक असल्याने ते आरोग्यासाठी अधिक चांगले मानले जातात.
रात्री उशिरा जेवण्याऐवजी झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण पूर्ण करणे अधिक फायदेशीर ठरते.
फक्त भात टाळल्याने वजन कमी होत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम वजन कमी करण्यात महत्त्वाचा असतो.