Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

२५० ग्रॅम पनीर, १ कांदा, १ शिमला मिरची, ४-५ लसूण पाकळ्या, १ टीस्पून आले, २ हिरव्या मिरच्या, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १ टेबलस्पून मैदा, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप, व्हिनेगर, मीठ, मिरपूड आणि तेल.

Paneer Chilli Recipe

पनीर मॅरिनेट करा

पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यात कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ, मिरपूड आणि थोडे पाणी घालून हलके मॅरिनेट करा. १५ मिनिटे तसेच ठेवा.

Paneer Chilli Recipe

पनीर तळून घ्या

कढईत तेल गरम करून मॅरिनेट केलेले पनीर सोनेरी रंग येईपर्यंत हलके तळून घ्या. हवे असल्यास एअर फ्रायरमध्येही तयार करू शकता.

Panner Chilli Recipe | Social Media

भाज्या परता

त्याच कढईत थोडे तेल घालून लसूण, आले, हिरवी मिरची, कांदा आणि शिमला मिरची मोठ्या आचेवर २ ते ३ मिनिटे परतून घ्या. भाज्यांचा कुरकुरीतपणा कायम ठेवा.

Paneer Chilli Recipe

सॉस तयार करा

भाज्यांमध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप आणि थोडे व्हिनेगर घाला. कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून घातल्यास ग्रेव्हीला छान घट्टपणा येतो.

Panner Chilli Recipe

पनीर मिसळा

तळलेले पनीर सॉसमध्ये घालून हलक्या हाताने टॉस करा. सर्व मसाले आणि सॉस पनीरला व्यवस्थित लागतील याची काळजी घ्या.

paneer dishes | google

गरमागरम सर्व्ह करा

स्प्रिंग ऑनियनने सजवून पनीर चिली गरमागरम सर्व्ह करा. फ्राईड राईस, हक्का नूडल्स किंवा मंच्युरियनसोबत याची चव आणखी खुलते.

Panner Chilli Recipe

Cham Cham Recipe: घरीच बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट चमचम, वाचा सोपी रेसिपी

Cham Cham Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा