Aadhar Card Update: आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्याची प्रोसेस आणखी सोपी;४५ पैकी एक कागदपत्र असेल तरी तुमचं काम होईल झटपट

Aadhar Card Address change Process: अनेकदा आपल्या आधार कार्डवरील पत्त्यामध्ये काही चुका असतात. त्यामुळे अनेक कामे करताना अडचणी येतात. अशातच आता आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस सोपी झाली आहे.
Aadhar Card Update
Aadhar Card UpdateSaam Tv
Published On

Aadhar Card Update Process & Documents: प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे अनिवार्य आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता असते. परंतु अनेकदा आधार कार्ड बनवताना त्यात चुकीची माहिती भरली जाते. त्यामुळे अनेक समस्या येतात.

आधार कार्डमध्ये चुकीची माहिती भरल्याने कोणत्याही प्रकारचे काम करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुमच्याही आधार कार्डमध्ये पत्ता चुकीचा असेल तर तुम्ही तो अपडेट करु शकतात. आधार कार्डवरील पासपोर्ट अपडेट करण्यासाठी एकदम सोपी प्रोसेस आहे. आज आम्ही तुम्हाला आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा याची माहिती देणार आहोत.

Aadhar Card Update
Unified Pension Scheme: शिंदे सरकारचा मोठा निर्णय , केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळणार, महाराष्ट्र पहिलेच राज्य!

आधार कार्ड अपडेट

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI ने काही नियम व अटी घातल्या आहेत. तुम्ही आधार कार्डवरील तारीख फक्त एकदाच बदलू शकतात. तुम्ही दोन वेळा कार्डवरील नाव बदलू शकतात.तुम्ही आधार कार्डवरील पत्ता कितीही वेळा बदलू शकतात. त्यासाठी काही नियम पाळावे लागतात. आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला फक्त काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. UIDAI ने ४५ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी कोणत्याही कागदपत्रांचा वापर करुन तुम्ही आधार कार्ड अपडेट करु शकतात.

Aadhar Card Update
2000 Note Exchange RBI : 2000 रुपयांच्या नोटांवर मोठी अपडेट, स्वतः रिझर्व्ह बँकेनेच कोर्टात सांगितले, ही नोटबंदी नाहीच!

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Documets Required For Aadhar Update)

पासपोर्ट, बँकेचे पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंट, रेशन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी सेवेद्वारे जारी केलेले ओळखपत्र, वीजेचे बिल, पाण्याचे बिल, टेलीफोन बिल, मालमत्ता कराची पावती, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट, विमा पॉलिसी,बँकेचे लेटरहेड, नोंदणीकृत कंपनीच्या लेटरहेडवर फोटो आणि सही असलेले पत्र, शैक्षणिक संस्थेचे लेहरहेड, जॉब आयडी,पेन्शनर कार्ड, CGHS/SCHS कार्ड, आमदार किंवा खासदार यांनी जारी केलेले नावनोंदणी, पत्त्याचे प्रमाणपत्र, इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, वाहन रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शेतकरी पासबुक, पोस्टद्वारे दिलेले पत्त्याचे कार्ड, गॅस कनेक्शन बिल,आई-वडिलांचा पासपोर्ट, मॅरेज सर्टिफिकेट,युआयडीएआय मानक प्रमाणपत्र, एसएसएलसी बुक,शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र वापरुन तुम्ही आधार कार्डचा पत्ता बदलण्यासाठी अप्लाय करु शकतात.

Aadhar Card Update
Government Scheme For Farmers : खुशखबर! शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात मिळणार तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंचे कर्ज; काय आहे केंद्र सरकारची नवी योजना? जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com