Marriage Certificate Application: घरबसल्या १० मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट; या सोप्या स्टेप्स करा फॉलो

How To Apply For Marriage Certificate Online: प्रत्येक व्यक्तीने आपलं लग्न रजिस्टर करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढायला लागते. हेच मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही घरबसल्या काढू शकतात.
Marrigae Certificate Application
Marrigae Certificate ApplicationSaam Tv
Published On

लग्न हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा क्षण असतो. अनेक जण मोठ्या थाटामाटात लग्न करतात तर अनेकजण रजिस्टर मॅरेज करतात. लग्न कितीही थाटामाटात केलं तरीही ते रजिस्टर करावं लागतं. तुमचं लग्न कायदेशीर पद्धतीने रजिस्टर करणे गरजेचे आहे. त्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट बनवणे गरजेचे आहे. यासाठी आता तुम्हाला ग्रामपंचायतीच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या मॅरेज सर्टिफिकेट काढू शकतात. त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक आहे. मोबाईल अॅपवरुन तुम्ही अर्ज करु शकतात.

Marrigae Certificate Application
EPFO Interest Rate: अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारचं गिफ्ट; EPFO च्या व्याजदरात भरघोस वाढ

ऑनलाइन पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढणे सोपे आहे. यासाठी तुम्हाला महाग्राम सिटिजन कनेक्ट हा अॅप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर साध्या पद्धतीने फॉर्म भरुन तुम्ही तुमचे लग्न कायदेशीर पद्धतीने रजिस्टर करावेत.

ऑनलाइन मॅरेज सर्टिफिकेट कसं तयार करावं?

  • सर्वप्रथम Mahaegram Citizen Connect अॅप तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करा. त्यानंतर लॉग इन करा. यानंतर तुमचं अकाउंट तयार होईल. अकाउंट तयार करण्यासाठी नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ई- मेल आयडी ही माहिती भरावी.

  • यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल.यात तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल. तुमचा मोबाईल नंबर तुमचा युजर आयडी असेल.त्यानंतर लॉग इन करा.

  • यानंतर तुमच्या समोर अॅपचा डॅशबोर्ड असेल. त्यावर तुम्हाला विवाह नोंदणी हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

Marrigae Certificate Application
Petrol Diesel Rate Today: देशात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या
  • विवाह नोंदणी अर्जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवरा आणि नवरीची सर्व माहिती भरायची आहे. तसेच विवाहाचे ठिकाण,वेळ याची माहिती द्यायची आहे. यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

  • यानंतर तुमच्या लग्नाला उपस्थित असलेल्या साक्षीदारांची काही महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

  • यानंतर तुमची लग्नपत्रिका, लग्नाचे फोटो असे सर्व पुरावे अपलोड करायचे आहेत.यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.

  • यानंतर तुमच्यासमोर अर्ज क्रमांक मिळेल. हा अर्ज क्रमांक घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीत घेऊन जायचा आहे. तिथे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर तुम्हाला तुमचं मॅरेज सर्टिफिकेट मिळेल.

Marrigae Certificate Application
PM Kisan Sanman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेअंतर्गत आता ८००० रुपये मिळणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com