पेन्शनधारकांना मोठा दिलासा! EPFO ने 'लाइफ सर्टिफिकेट' सादर करणे केले सोपे

EPFO ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे की EPS'95 पेन्शनधारक आता....
EPFO updates, EPFO News Updates
EPFO updates, EPFO News Updates Saam TV
Published On

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना वेळोवेळी पेन्शनधारकांच्या सोयीसाठी पावले उचलत असते. आता EPFO ​​ने पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्यासाठी मोठा दिलासा दिला आहे. आता पेन्शनधारक कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. विशेष बाब म्हणजे जेव्हा ते प्रमाणपत्र सादर करतील तेव्हा ते त्या तारखेपासून एक वर्षासाठी ते प्रमाणपत्र वैध असेल. (EPFO updates)

EPFO ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे की EPS'95 पेन्शनधारक आता कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जे त्यांनी सादर केलेल्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध मानले जाईल. पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन मिळण्यासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत आहे की मरण पावली आहे हे जीवन प्रमाणपत्र दाखवते. पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. याशिवाय बँक आणि पोस्ट ऑफिसमध्येही ते जमा करता येणार आहे.

EPFO updates, EPFO News Updates
Appleच्या इंजिनिअरने दिला थेट राजीनामा, कारण जाणून आश्चर्य वाटेल!

जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करण्यासाठी, प्रथमच, पेन्शनधारकांना बँक, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही सरकारी एजन्सीद्वारे चालवल्या जाणार्‍या जीवन प्रमाण केंद्राद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीमध्ये पेन्शनधारकांचे आधार आणि बायोमेट्रिकद्वारे एक युनिक आयडी तयार केला जाईल. हा आयडी तयार झाल्यानंतर, पेन्शनधारक पेन्शन वितरण बँक, उमंग अॅप किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करू शकतात. याशिवाय निवृत्तीवेतनधारक हा आयडी तयार झाल्यानंतर https://jeevanpramaan.gov.in या पोर्टलला भेट देऊन जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सबमिट करू शकतात.

जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक

जीवन प्रमाणपत्र हा निवृत्तीवेतनधारक जिवंत असल्याचा पुरावा आहे. जमा न केल्यास पेन्शन थांबवता येणार आहे. जर निवृत्तीवेतनधारक पुन्हा नोकरीवर असेल किंवा निवृत्ती वेतन धारकाने पुनर्विवाह केला असेल, तर जीवन प्रमाणपत्र फिजीकल स्वरूपातच सादर करावे लागेल. हे जीवन प्रमाणपत्र संपुर्ण आयुष्यभरासाठी वैध नाही. वैधता कालावधी संपल्यानंतर, नवीन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com