Kalyan News: रस्त्यावर आढळलेली मतदारांचे ओळखपत्र; नोटीस मिळताच मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून खुलासा

Kalyan Voter Card Found On Road: कल्याण शीळ रोडवर मतदारांची ओळखपत्रे एका गोणीत सापडल्याने खळबळ उडाली. मतदारांची ओळखपत्रे अशी रोड सापडल्याने संबंधित मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलीय. तर मतदार नोंदणी अधिकाऱ्याला सदर प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावं लागलंय.
Kalyan News: रस्त्यावर आढळलेली मतदारांचे ओळखपत्र; नोटीस मिळताच मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून खुलासा
Kalyan Voter Card Found On Road
Published On

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याण: लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी काही उमेदवारांनी केल्या होत्या. तर काही ठिकाणी मतदारांची नावेच मतदार यादीत गायब असल्याचं प्रकार समोर आले होते. त्यावरून राजकारण तापलं होतं. यादरम्यान मतदारांची ओळखपत्र कल्याण शीळ रस्त्यावर सापडल्यानं मोठी खळबळ माजली. त्यानंतर खडबडून जागे झालेले मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना या प्रकारचा खुलासा केलाय.

कल्याण शीळ रोडवर सापडलेली मतदार ओळखपत्रे ही जुनी आहेत. मतदारांनी जमा केलेली ही मतदार ओळखपत्रे केडीएमसीच्या शाळेत ठेवण्यात आली होती .संबंधीत शाळेतील रद्दी एका टेम्पोतून भरुन दुसरीकडे नेत असताना ओळखपत्रांची गोणी देखील होती. ही गोणी खाली रस्त्यावर पडल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली. तसेच मतदार ओळखपत्र शासकीय दस्तावेज असल्याने याप्रकरणी संबंधित पाच बीएलोना म्हणजे मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या.

तसेच याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांचा तपास सुरू आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया कल्याण मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिलीय.

आढळलेली मतदार कार्ड जुनी आहेत. नागरिकांना नवीन मतदार ओळखपत्र पाहिजे असल्यास जुनी जमा करावी लागतात. तीच ही ओळखपत्र आहेत. एकूण ७२० जुनी मतदार ओळखपत्र आढळून आली होती, त्यापैकी ६७९ मतदार ओळखपत्र ही २००६ ते २०१४ दरम्यानची आहेत . ४१ स्मार्ट कार्ड ही २०१७ ते २०२१ कालावधीतील आहे.

कल्याण पूर्वेकडील नेतीवली येथील केडीएमसीच्या शाळेत बीएलओमार्फत ही ओळखपत्र जमा करण्यात आली होती. कल्याण शीळ रोडवर आढळलेल्या गोणीत त्या शाळेतील काही विद्यार्थ्यांचे मार्कशीट मिळून आल्याने ही ओळखपत्र कुठून आली आहेत याची माहिती मिळाली असून संबंधित शिक्षण विभागालाही बीएललो असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com